मोदी सरकारचा मेगा प्लॅन! पगार आणि PF च्या नियमांमध्ये होणार मोठे बदल?

 केंद्र सरकार 1 ऑक्टोबरपासून देशात लेबर कोडच्या नियमांना लागू करण्याच्या तयारीत आहे. हे कायदे लागू होताच कर्मचाऱ्यांच्या टेक होम सॅलरी आणि PF नियमांच्या स्ट्रक्चरमध्ये बदल होऊ शकतो

Updated: Jul 30, 2021, 10:49 AM IST
मोदी सरकारचा मेगा प्लॅन! पगार आणि PF च्या नियमांमध्ये होणार मोठे बदल? title=

नवी दिल्ली : केंद्र सरकार 1 ऑक्टोबरपासून देशात लेबर कोडच्या नियमांना लागू करण्याच्या तयारीत आहे. हे कायदे लागू होताच कर्मचाऱ्यांच्या टेक होम सॅलरी आणि PF नियमांच्या स्ट्रक्चरमध्ये बदल होऊ शकतो. नवीन नियमांनुसार PF मध्ये जास्त पैसे जमा होऊ शकतील.

केंद्र सरकार 4 कामगार कायदे लवकरात लवकर लागू करण्याच्या प्रयत्नात आहे. 1 जुलै पासून लेबर कोडच्या नियमांना लागू करण्याचे नियोजन होते. परंतु राज्य सरकारं तयार नव्हती. चारही कामगार कायद्यांना केंद्र आणि राज्याच्या नियमांनुसार अधिसूचित करावे लागणार आहे. कामगार कायदे लागू झाल्यानंतर सॅलरी स्ट्रक्चरमध्ये अनेक बदल होणार आहेत.

नवीन कायदे कर्मचाऱ्यांच्या मुळ वेतन आणि PF वर मोठा प्रभाव टाकू शकतात. श्रम मंत्रालय औद्योगिक संबध, वेतन, सामाजिक सुरक्षा, व्यवसायिक आणि आरोग्य सुरक्षा आदी नियमांना लागू करण्याच्या तयारीत आहे. 

नियमांच्या बदलानंतर कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी 15000 रुपयांवरून वाढून 21000 होऊ शकते. लेबर युनियनची मागणी होती की, बेसिक सॅलरी 15 हजारावरून 21 हजार करावी. जर असे झाले तर तुमचा पगार वाढ शकतो.