Ration Card Update Tips in Marathi : रास्त धान्य दुकानात केंद्र सरकार देशातील 80 कोटींहून अधिक गरीब लोकांना दरमहा अन्नधान्य उपलब्ध करुन देण्यासाठी पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना (PMGKAY) चालवत आहे. योजनेनुसार रेशन कार्डधारकांना कुटुंबातील सदस्यांच्या संख्येनुसार निश्चित धान्य मिळते. आता तुम्हाला तुमच्या रेशन कार्डमध्ये नवीन सदस्याचे नाव टाकून जास्तीचे धान्य मिळू शकते. मात्र, रेशन कार्डवर नाव चढवायचे असेल तर धान्य पुरवठा कार्यालयात जावे लागते. आता त्याची गरज नाही. कारण तुम्ही घरी बसून ऑनलाईन पद्धतीने रेशन कार्डवर नवीन सदस्याचे नाव टाकू शकता.
शिधापत्रिकाधारकांना (Ration Card) कुटुंबातील सदस्यांच्या संख्येनुसार धान्य मिळते. शिधापत्रिका फक्त धान्य मिळवण्यासाठी वापरली जात नाही, तर रेशनकार्ड हे ओळखपत्र म्हणूनही काम करते. बँक खाते उघडण्यापासून ते सरकारी योजना आणि खासगी योजनांसाठी रेशन कार्डचा वापर ओळख म्हणून करता येतो. जर तुमच्या घरात नवीन सदस्य असेल आणि त्याचे नाव रेशन कार्डमध्ये अपडेट किंवा जोडायचे असेल तर एक सोपी पद्धत आहे. रेशन कार्डमध्ये नाव जोडण्याचे काम ऑफलाइन आणि ऑनलाइन करता येते.
केंद्र सरकार शिधापत्रिकाधारकांना प्रति युनिट 5 किलो गहू आणि तांदूळ मोफत देते. म्हणजेच तुमच्या घरात जर 5 सदस्य असतील तर प्रत्येक सदस्याला 5 किलो गव्हानुसार दर महिन्याला 25 किलो गहू आणि तांदूळ मिळेल. याशिवाय राज्य सरकार रेशनकार्डवर प्रति युनिट अन्नधान्याव्यतिरिक्त मीठ, तेल इत्यादी देत आहे.
मूल जन्माला येते किंवा नवविवाहित स्त्री घरात प्रवेश करते तेव्हाच Ration Card मध्ये नवीन नाव जोडले जाते. तुम्ही ऑफलाइन किंवा ऑनलाइन नावे जोडू शकता. नाव जोडण्यासाठी विवाह प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, प्रतिज्ञापत्र आणि पासपोर्ट आकाराचा फोटो आवश्यक असतो.
शिधापत्रिकेत नाव टाकण्यासाठी तुम्ही ऑफलाइन अर्जही करु शकता (Ration Card Name Add Offline)