Coronavirus: या राज्यातील चार शहरांमध्ये कर्फ्यू

राजस्थान (Rajsthan) च्या ८ शहरांनंतर गुजरात (Gujarat)च्या ४ शहरांमध्ये रात्री कर्फ्यू (Night Curfew) लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

Updated: Nov 22, 2020, 09:37 PM IST
Coronavirus: या राज्यातील चार शहरांमध्ये कर्फ्यू  title=

नवी दिल्ली : कोरोना वायरस (Coronavirus) च्या वाढत्या प्रकरणांमुळे सर्वांचीच चिंता वाढवलीय. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये नियमांचे काटेकोर पालन करण्यात आलंय. राजस्थान (Rajsthan) च्या ८ शहरांनंतर गुजरात (Gujarat)च्या ४ शहरांमध्ये रात्री कर्फ्यू (Night Curfew) लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. सोमवारपासून गुजरातच्या ४ शहरांमध्ये रात्रीपासून कर्फ्यू लागू करण्यात येणार आहे.

इन शहरांमध्ये रात्री कर्फ्यू 

अहमदाबाद (Ahmedabad), सूरत (Surat), वडोदरा (Vadodara) आणि राजकोट (Rajkot)मध्ये रात्रीपासून कर्फ्यू लागू करण्यात आल्याचे गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी (CM vijay Rupani) यांनी सांगितले. 

गुजरातमध्ये गेल्या २४ तासात १ हजार ४९५ कोरोना केसेस समोर आले. १ हजार १६७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला तर १३ जणांचा मृत्यू झाला. राज्यात कोरोनाची एकूण १ लाख ९७ हजार ४१२ प्रकरण समोर आली. ज्यामध्ये १ लाख ७९ हजार ९५३ बरे झाले. १३ हजार ६०० सक्रीय प्रकरण असून ३ हजार ८५९ जणांचा मृत्यू झाला.

राजस्थानमध्ये ८ शहरांमध्ये कर्फ्यू 

याआधी राजस्थान ८ शहरामध्ये रात्री आठ वाजल्यापासून सकाळी ६ वाजेपर्यंत नाइट कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेण्यात आला. या वेळेत लोकांनी घरातून बाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले. नियम तोडणाऱ्यांवर राजस्थान महामारी कायद्याअंतर्गत कारवाई केली जातेय. राजस्थान जयपुर, जोधपुर, बीकानेर, उदयपुर, अजमेर, अलवर, कोटा आणि भीलवाड़ा जिल्ह्यामध्ये नाईट कर्फ्यू लावण्यात आलाय.