२००० रुपयांची नोट बंद होणार आहे का? मोदी सरकारने दिले हे उत्तर

  २०१६ मध्ये नोटबंदी लागू करण्यात आल्यानंतर २००० रुपयांची नोट चलनात आली. त्यानंतर ही नोट बंद करण्याच्या विचारात मोदी सरकार असल्याचे वृत्त होते. याबाबत आज लोकसभेत २००० नोट बंद होणार नाही, असे स्पष्ट करण्यात आलेय. तसेच अशी काही योजना नाही, असेही स्पष्ट करण्यात आले.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 16, 2018, 10:23 PM IST
 २००० रुपयांची नोट  बंद होणार आहे का? मोदी सरकारने दिले हे उत्तर title=

नवी दिल्ली :  २०१६ मध्ये नोटबंदी लागू करण्यात आल्यानंतर २००० रुपयांची नोट चलनात आली. त्यानंतर ही नोट बंद करण्याच्या विचारात मोदी सरकार असल्याचे वृत्त होते. याबाबत आज लोकसभेत २००० नोट बंद होणार नाही, असे स्पष्ट करण्यात आलेय. तसेच अशी काही योजना नाही, असेही स्पष्ट करण्यात आले.

वित्त राज्यमंत्री पी राधाकृष्णन यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, २००० रुपयांची नोट बंद करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही. तसेच देशात ५ शहरांत १० रुपयांची प्लास्टिक नोट आणण्याचा प्रस्ताव आहे. लवकरच ही नोट चलनात दिसेल.

वित्त राज्यमंत्री पी राधाकृष्णन यांना विचारले गेले, अर्थ मंत्रालय भविष्यात २००० रुपयांची नोट बंद करण्याची योजना आखत आहे का? यावर सरकारकडून उत्तर आलेय. राधाकृष्णन यांनी लोकसभेत स्पष्ट केले की ५०० आणि २००० रुपयांच्या नोटेमध्ये १० एमएमचे अंतर ठेवण्यात आलेय. त्यामुळे दोन्ही नोटा लगेच ओळखता येऊ शकतात.

८ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री ८ वाजता नोटबंदीची घोषणा मोदी यांनी केली. त्यानंतर देशातील चलनातून ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बाद झाल्या. त्यानंतर सरकारने ५०० आणि २००० रुपयांची नवी नोट चलनात आणली.