नोएडा: रविवार म्हणजे सर्वांसाठी विश्रांती आणि आवडीचे खेळ खेळण्याचा दिवस. या दिवशी आपला सर्व ताण विसरून क्रिकेट खेळण्यासाठी सर्व तरुण आणि युवक एकत्र जमले. क्रिकेटचा खेळ सुरू झाला. डाव रंगात आला असतानाच अचानक फलंदाजी करणाऱ्या युवकानं बॉल मारला आणि तो गटारात पडला. हा बॉल काढण्यासाठी युवक गटारात उतरले.
गटारात उतरण्य़ाच्या नादात एक मोठी दुर्घटना घडली आहे. गटार मोठं होतं आणि त्यामध्ये पाण्याचा प्रवाह जास्त होता. त्यामुळे तरुण खाली ओढला गेला. त्याला वाचवण्यासाठी इतर तरुण उतरले मात्र 5 तरुण खाली गेले. त्यापैकी दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाला आहे.
नोएडाच्या सेक्टर 5मध्ये रविवारी मोठी दुर्घटना घडली. 2 जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. सफदरजंग रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू आहेत. ही घटना जल महामंडळ पार्कमध्ये हे 5 तरुण खेळत असताना दुर्घटना घडली आहे. गटारात पडून 2 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे खेळाच्या आनंदावर विरजण पडलं. तर जखमी तरुणांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार स्थानिकांच्या मदतीनं या तरुणांना वाचवण्याचा प्रयत्न केला. 4 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. तेव्हा डॉक्टरनं 2 जणांना मृत घोषित केलं आहे. तर 2 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जल महामंडळच्या या प्लॅन्टमध्ये उतरण्यासाठी मनाई करण्यात आली होती. मात्र तरीही बॉल काढण्यासाठी तिथे उरल्यानं ही दुर्घटना घडल्याचं सांगितलं जात आहे.