मोदी सरकारला इशारा नाही शाप देतोय - टीडीपी

टीडीपीने केले गंभीर आरोप

Updated: Jul 20, 2018, 12:12 PM IST
मोदी सरकारला इशारा नाही शाप देतोय - टीडीपी title=

नवी दिल्ली : आज लोकसभेत मोदी सरकारविरोधात अविश्वास ठराव आणण्यापूर्वी टीडीपीने मोदी सरकारवर अनेक गंभीर आरोप केले. टीडीपीने यावेळी मोदी सरकारला इशारा नाही तर शाप देत असल्याचं म्हटलं. टीडीपीचे खासदार जयदेव गल्ला यांनी सरकारवर अनेक गंभीर आरोप केले. आंध्र सरकारला विशेष राज्याचा दर्जा देण्यात यावा ही मागणी करत नाही सरकारने कशा प्रकारे आंध्रप्रदेशवर अन्याय केला याबाबत लोकसभेत आपली बाजू मांडली.

जयदेव गल्ला यांनी म्हटलं की, तेलंगणा नाही तर आंध्र प्रदेश नवं राज्य झालं. आंध्र प्रदेशच्या लोकांवर अन्याय झाला. केंद्राने आमच्या खात्यातून पैसे परत घेतले. आंध्रप्रदेश सोबत सरकारने अन्याय केला. आंध्र प्रदेशच्या लोकांमध्ये खूप पीडा आहे. आंध्रला केंद्राकडून कोणतीही मदत नाही मिळाली. केंद्र सरकारने आंध्र प्रदेशला दिलेलं वचन नाही पाळलं. आंध्रमध्ये अनेक अडचणी आहेत. लोकांचं इन्कम कमी झालं आहे. राज्य कर्जाखाली दाबलं गेलं आहे. बुंदेलखंड पेक्षाही अधिक भेदभाव आंध्र सोबत झाला आहे. आंध्रप्रदेशाचं डरडोई उत्पन्न कमी झालं आहे. आंध्रला विशेष राज्याच्या दर्जा द्या ही मागणी करत टीडीपीच्या खासदारांनी मोदी सरकारवर अनेक आरोप केले.