नवी दिल्ली : तुम्हीही नोकरी करता? तर मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. चला तर मग पाहूयात काय आहे ही खूशखबर...
आता तुम्हाला नोकरी बदली केल्यास पीएफ खात्याची चिंता करण्याची काहीही गरज नाहीये. सरकारने नोकरदार वर्गासाठी एक गिफ्टचं दिलं आहे.
नोकरी बदली केल्यावर सर्वांना प्रश्न पडतो की पीएफ खात्याचं करायचं काय? भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीएफ खात्यातील पैसे काढण्यासाठी तसेच नव्या कंपनीत नवं खातं उघडण्याचा त्रास सर्वांनाच होतो. पण आता तसं काहीही होणार नाहीये. कारण, आता नोकरी बदलताच आपोआप तुमचं पीएफ खातंही ट्रान्सफर होणार आहे.
मुख्य भविष्य निर्वाह निधी आयुक्त व्ही. पी. जॉय यांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्मचा-यांसाठी पीएफची प्रक्रिया अधिक सरळ आणि सोपी व्हावी यासाठी आम्ही बदल करत आहोत. सप्टेंबर महिन्यापासून, समजा तुम्ही नोकरी बदलली तर तुमचं पीएफ खातं बंद होणार नाही.
नोकरी बदलली की अनेक पीएफ खाती बंद होतात. मात्र, आता तसं होणार नाहीये. प्रत्येक कर्मचा-याला आता नोंदणीसाठी आधार कार्ड सक्तीचं केलं आहे. त्यामुळे आता जुनं पीएफ खातं बंद होणार नाहीये. म्हणजेच तुम्ही जर नोकरी सोडली आणि दुस-या कंपनीत गेलात तर तुमचं पीएफ खातंही ट्रान्सफर होईल. महत्वाचं म्हणजे, अर्जाशिवायच त्याचे पीएफ खात्यातले पैसे तीन दिवसांत ट्रान्सफर होतील.
आता नोंदणीसाठी आधार कार्ड सक्तीचं केल्याने हे पीएफ खातं बंद होणार नाही. तसेच पीएफ खात्यातले पैसे तीन दिवसांत ट्रान्सफर होतील. जर कर्मचा-याकडे आधार आयडी आणि वेरिफाइड आयडी असेल तर तो देशभरात कुठेही नोकरीसाठी गेला तरी त्याचं पीएफ खातं ट्रान्सफर होईल अशी माहिती मुख्य भविष्य निर्वाह निधी आयुक्त व्ही. पी. जॉय यांनी दिली आहे.