close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

निकालाआधी भाजपला झटका, NPF ने पाठिंबा काढून घेतला

निवडणूक निकालाआधी भाजपला झटका

Updated: May 19, 2019, 04:37 PM IST
निकालाआधी भाजपला झटका, NPF ने पाठिंबा काढून घेतला

इंफाळ : मणिपूरमध्ये नागा पीपल्स फ्रंट (NPF) ने राज्यात भाजप सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. एनपीएफचे मणिपुर प्रदेशाध्यक्ष अवांगबौ न्यूमई यांनी रविवार म्हटलं की, 'आमचा नाईलाज होता. म्हणून आम्हाला पाठिंबा काढून घ्यावा लागला. कारण मोठे पक्ष छोट्या पक्षांना कमी लेखतात. पाठिंबा काढून घेण्याचा निर्णय झाला असून 23 मेला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर तो लागू केला जाईल.'

भाजपचे वरिष्ठ नेत्याने म्हटलं की, एनपीएफने पाठिंबा काढून घेतला असला तरी याचा युतीवर परिणाम होणार नाही. 60 सदस्यांच्या विधानसभेत भाजपकडे 29 जागा आहेत. सोबतच लोजपा आणि एआयटीसीच्या एक-एक आमदाराचा भाजपला पाठिंबा आहे. तसेच एका अपक्ष आमदाराचा देखील भाजपला पाठिंबा आहे. एनपीएफचे चार आमदार आहेत.

2017 विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे 29 आमदार होते. पण 8 आमदारांनी मागच्या वर्षी भाजपमध्ये प्रवेश केला. ज्यामुळे काँग्रेस आमदारांची संख्या 21 झाली. न्यूमई यांनी दावा केला आहे की, एनपीएफला पाठिंबा काढून घेण्यासाठी मजबूर व्हावं लागलं. भाजपने त्यांना सन्मानजनक वागणूक दिली नाही. आम्ही 2 वर्ष वाट पाहिली.'

भाजपने मात्र या आरोपांचं खंडन केलं आहे. एनपीएफ प्रवक्ते ए किकोन यांनी म्हटलं की, एनपीएफचे केंद्रीय नेते आणि मणिपूरच्या आमदारांचं मत आहे की, त्यांच्या या निर्णय़ामुऴे निवडणूक प्रक्रियेत बाधा येऊ नये. म्हणून 23 तारखेनंतर पाठिंबा काढल्याची घोषणा केली जाईल.'