एनएसजीला मिळणार स्वत:चं हेलिकॉप्टर

भारताचे राष्ट्रीय सुरक्षा रक्षक म्हणजेच एनएसजी जगातील खूपच प्रशिक्षित कमांडो मानले जातात. एनएसजीचे शूर कमांडो प्रत्येक कठीण क्षणात देशातील सुरक्षेसाठी धावून येतात. पण एनएसजीकडे आपातकालीन परिस्थितीत स्वतःचं हेलिकॉप्टर नाही. पण लवकरच एनएसजीकडे आता त्वरित कारवाईसाठी स्वतःचं हेलिकॉप्टर असणार आहे. गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी एनएसजीची ही हेलिकॉप्टर कमतरता भरुन काढण्यासाठी खाजगी विमान वाहतूक कंपन्याकडे पर्याय शोधण्याचा सल्ला दिला आहे.

Updated: Jun 6, 2017, 04:40 PM IST
एनएसजीला मिळणार स्वत:चं हेलिकॉप्टर title=

नवी दिल्ली : भारताचे राष्ट्रीय सुरक्षा रक्षक म्हणजेच एनएसजी जगातील खूपच प्रशिक्षित कमांडो मानले जातात. एनएसजीचे शूर कमांडो प्रत्येक कठीण क्षणात देशातील सुरक्षेसाठी धावून येतात. पण एनएसजीकडे आपातकालीन परिस्थितीत स्वतःचं हेलिकॉप्टर नाही. पण लवकरच एनएसजीकडे आता त्वरित कारवाईसाठी स्वतःचं हेलिकॉप्टर असणार आहे. गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी एनएसजीची ही हेलिकॉप्टर कमतरता भरुन काढण्यासाठी खाजगी विमान वाहतूक कंपन्याकडे पर्याय शोधण्याचा सल्ला दिला आहे.

आढावा बैठकीत गृहमंत्र्यांनी हेलिकॉप्टरच्या खाजगी विमान वाहतूक कंपन्यांकडे पर्याय शोधण्यास सांगितलं आहे. भारतात कोणत्याही आपातकालीन परिस्थितीत नोंदणीकृत खाजगी कंपन्या हेलिकॉप्टर वापरण्याची परवानगी आहे पण विमान अपहरण परिस्थितीत फक्त सरकारचे हेलिकॉप्टर वापरण्याची परवानगी आहे.

सरकारने लवकरच हेलिकॉप्टर पुरवण्याचं आश्वासन एनएसजीला दिलं आहे. वायुसेना किंवा सीमा सुरक्षा दलाचं एक हेलिकॉप्टर देखील एनएसजीला दिलं जाण्याची शक्यता आहे.