NTA Changes JEE Main 2023 Schedule : आयआयटी, एनआयटीसह इतर अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठीची अहोरात्र मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. परीक्षेच्या 4 दिवसांपूर्वी वेळापत्रकात मोठा बदल करण्यात आला आहे. त्यामुळे ही परीक्षा देण्याऱ्या विद्यार्थ्यांनी ही बातमी खूप महत्त्वाची आहे. JEE Mains 2023 च्या परीक्षेची तारीखेत बदल केला आहे, अशी माहिती NTA ने अधिकृत अधिसूचनेद्वारे जारी केली आहे. (NTA Changes JEE Main 2023 Schedule change 4 days before JEE Mains exam date January 24 to 01 February 2023 No paper on 27th January marathi news)
JEE Mains 2023 ची परीक्षा 24 जानेवारी 2023 पासून 31 जानेवारी 2023 पर्यंत असणार आहे. जुन्या वेळापत्रकानुसार 24, 25, 27, 29, 30 आणि 31 जानेवारी ते 01 फेब्रुवारी 2023 या दिवशी पेपर होणार होते. आता नवीन वेळापत्रकानुसार 24, 25, 28, 29, 30 आणि 31 जानेवारी ते 01 फेब्रुवारी 2023 या दिवशी पेपर होणार आहे. याचा अर्थ 27 तारखेचा पेपर आता 28 जानेवारीला होणार आहे. पूर्वी परीक्षा 31 जानेवारी 2023 संपणार होती आता ही परीक्षा 01 फेब्रुवारी 2023 संपणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या तारखा अपडेट करुन घ्या. NTA JEE Main ची अधिकृत वेबसाईट, jeemain.nta.nic.in वर ही माहिती देण्यात आली आहे. याशिवाय, BAarch आणि Biplanning म्हणजेच JEE मेन पेपर 2 ची परीक्षा 28 जानेवारीला दुसऱ्या शिफ्टमध्ये घेण्यात येणार आहे.
NTA ने JEE Main जानेवारी 2023 परीक्षेची City Slip जारी केल्यामुळे विद्यार्थ्यांनी ती त्वरीत काढून घ्यावी. ही स्लीप तुम्हाला अधिकृत वेबसाईटवरुन काढता येणार आहे. ही परीक्षा देशातील 290 आणि परदेशातील 25 शहरांमध्ये होणार आहेत.