CUET UG परिक्षेचा निकाल जाहीर; 'या' ठिकाणी येईल पाहता

CUET UG Result 2022 : निकाल जाहीर झाला असून परीक्षार्थी CUET UG च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन त्यांचा निकाल पाहू शकतात. (येथे क्लिक करा)  

Updated: Sep 16, 2022, 08:14 AM IST
CUET UG परिक्षेचा निकाल जाहीर; 'या' ठिकाणी येईल पाहता title=

NTA CUET UG Result 2022 Release : नॅशनल टेस्टिंग एजन्सी अर्थात NTA ने कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट CUET UG 2022 चा निकाल जाहीर केला आहे. CUET UG चा निकाल तपासण्यासाठी उमेदवारांना त्यांचा अर्ज क्रमांक आणि पासवर्ड आवश्यक असणार असून ही माहिती त्यांच्या प्रवेशपत्रावर उपलब्ध आहे.

CUET UG 2022 चा निकाल गुरुवारी, 15 सप्टेंबर 2022 रोजी रात्री 10 वाजता जाहीर होणार होता. परंतु हा निकाल रात्री जाहीर न होता आज सकाळी जाहीर करण्यात आला आहे. यासंदर्भात यूजीसीचे अध्यक्ष एम जगदेश कुमार यांनीही 15 सप्टेंबर 2022 पर्यंत निकाल जाहीर होणार असल्याची माहिती दिली होती. या वर्षी CUET UG परीक्षेत बसलेले सर्व उमेदवार cuet.samarth.ac.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांचा निकाल तपासू आणि डाउनलोड करू शकणार आहेत.

असा चेक करा निकाल

- सर्वप्रथम उमेदवारांनी https://cuet.samarth.ac.in/ या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.

- त्यानंतर निकालासाठी CUET UG Result 2022  या लिंकवर क्लिक करा.

- तुमचा नोंदणी क्रमांक, जन्मतारीख आणि सुरक्षा पिन प्रविष्ट करा.

- वरील आवश्यक सर्व माहिती प्रविष्ट केल्यानंतर स्क्रिनवर तुम्हाला तुमचा निकाल दिसेल.

- तो डाउनलोड करून त्याची प्रिंट घ्या.  

दरम्यान केंद्रीय विद्यापीठे आणि इतर सहभागी संस्थांमध्ये पदवीपूर्व प्रवेशासाठी आयोजित केलेल्या CUET UG 2022 च्या पहिल्या टप्प्यात सुमारे 14 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. एकूण नोंदणीकृत उमेदवारांपैकी 60% उमेदवार परीक्षेला बसले होते. NTA ने 15 नोव्हेंबर ते 30 ऑगस्ट दरम्यान सहा टप्प्यात प्रवेश परीक्षा घेतली. विद्यापीठांमध्ये पदवीपूर्व प्रवेशासाठी ही पहिली सामान्य प्रवेश परीक्षा आहे. CUET UG 2022 ची प्रवेश परीक्षा देशातील 259 शहरांमधील 489 केंद्रांवर घेण्यात आली.