Crime News: महिलेने शिक्षकाला दिली 'रात्रीची ऑफर', जंगलात नेलं अश्लिल Video बनवला अन्...

Obscene Video Of Teacher: का महिलेने फोन उचलला आणि सांगितलं की, माझं माझ्या पतीसोबत भांडण झालंय. तू माझ्याशी प्रेमानं बोल. शिक्षकाला तिने एका भयान शांतता असलेल्या रस्त्यावर बोलवलं अन्...

Updated: Mar 25, 2023, 09:34 PM IST
Crime News: महिलेने शिक्षकाला दिली 'रात्रीची ऑफर', जंगलात नेलं अश्लिल Video बनवला अन्...
Obscene Video Of Teacher Crime News

Bhilwada Crime News : पैशासाठी माणूस कोणत्या थरावर जाईल काही सांगता येत. कानावर विश्वास बसणार नाही अशा दररोज वेगवेगळ्या गोष्टी ऐकायला मिळत असतात. अशातच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका महिलेने शिक्षकासोबत रात्र घालवण्याची ऑफर देती अन् नको ते केलं. या घटनेनंतर राजस्थानमधील संपूर्ण भिलवाडा (Rajasthan Crime News) जिल्ह्यात एकच खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. झालं असं की...

नेमकं काय झालं?

खाटीखेडा येथील शाळेतील शिक्षक भंवर सिंग चुंडावत (Bhanwar Singh Chundawat) यांना सुमारे 10 दिवसांपूर्वी त्यांना फोन आला. त्यावेळी त्यांना फोन उचलायला जमलं नाही. त्याच दिवशी चुकून त्यांनी त्याच नंबरवर पुन्हा कॉल केला, यादरम्यान एका महिलेने फोन उचलला आणि सांगितलं की, माझं माझ्या पतीसोबत भांडण झालंय. तू माझ्याशी प्रेमानं बोल. त्यानंतर त्यांनी फोन कट केला. (Obscene Video Of Teacher recorded by Honeytrap women rajasthan crime news)

दुसऱ्या दिवशी पुन्हा शिक्षकाला महिलेचा फोन आला. म्हणाली माझ्याशी बोल, मी पण एकटी आहे. मला एकटं एकटं वाटतंय. त्यानंतर महिला सतत फोन करत होती. दुसऱ्या दिवशी महिला भीलवाडा येथील रुग्णालयात दाखल असलेल्या आपल्या मावशीला भेटायला गेली, जिथं ती अनेक वेळा फोन करून भेटायला सांगितलं आणि रात्री इथंच थांबणार असल्याचं सांगितलं. 

शिक्षकाला तिने एका भयान शांतता असलेल्या रस्त्यावर बोलवलं. ती शिक्षकाच्या गाडीत बसली. तिच्यासोबत दोन पुरूष देखील होते. तिने ते भाऊ असल्याचं सांगितलं. गाडी थोडी पुढे गेल्यावर जंगल लागलं. त्यावेळी तिघांनी मिळून शिक्षकाला थांबवलं. त्याला खाली उतरवलं आणि पैशाची मागणी केली. त्यावेळी त्याचे कपडे काढले आणि त्याचा न्यूड व्हिडिओ (Nude videos) शूट केला आणि धमकी दिली.

आणखी वाचा - Crime News : 38 वर्षाच्या भाभीचं 20 वर्षाच्या दीरासोबत जुळलं सूत, अन् असा झाला प्रेमाचा अंत!

दरम्यान, न्यूड व्हिडिओ (Teacher Obscene Video) व्हायरल केला तर तुझी नोकरी जाईल, अशी धमकी दिली. त्यानंतर शिक्षकाने थेट पोलीस स्टेशन (Police Station) गाठलं आणि सर्व प्रकार सांगितला. शिक्षक भंवर सिंग चुंडावत यांनी ब्लॅकमेलिंग आणि हनीट्रॅपचा (Honeytrap) गुन्हा दाखल केला आणि आरोपींना गजाआड केलंय.