ISRO ची मोठी झेप, PSLV-C54 रॉकेटसह 8 नॅनो उपग्रह अवकाशात यशस्वीरित्या केले प्रक्षेपित

ISRO News: भारतासाठी अभिमानाची बातमी. इस्रोकडून आज 8 नॅनो सॅटेलाईटचं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.

Updated: Nov 26, 2022, 02:54 PM IST
ISRO ची मोठी झेप, PSLV-C54 रॉकेटसह 8 नॅनो उपग्रह अवकाशात यशस्वीरित्या केले प्रक्षेपित title=

Oceansat-3 Launching: इस्रोकडून आज 8 नॅनो सॅटेलाईटचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. यासोबत ओशनसॅट-3चंही यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. ओशनसॅट सीरिजमधील हे थर्ड जनरेशन सॅटेलाईट आहे.PSLV सी-54या रॉकेटद्वारे श्रीहरिकोटाहून हे उपग्रह अवकाशात झेपावले. यात भूतानच्याही एका उपग्रहाचा समावेश आहे. (ISRO successfully launches PSLV-C54 rocket)

संभाव्य चक्रीवादळाची मिळणार माहिती

ओसनसॅट सीरिजच्या (Oceansat-3) सॅटेलाइटचा अर्थ ऑब्जर्वेशन सॅटेलाइट असा आहे. समुद्र विज्ञान आणि वातावरणाच्या अभ्यासासाठी हे सॅटेलाइट अवकाशात सोडण्यात आले. हे सॅटेलाइट समुद्रातील हवामानाचा पूर्व अंदाज व्यक्त करण्यास सक्षम आहे. त्यामुळे संभाव्य चक्रीवादळाची माहिती मिळू शकेल आणि होणारे मोठे नुकसान टाळता येऊ शकेल. 

इस्रोने PSLV-C54 रॉकेटसह 8 नॅनो उपग्रह अवकाशात यशस्वीरीत्या प्रक्षेपित केले

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) आज शनिवारी सकाळी 11.56 वाजता श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरमधून ओशनसॅट-3 आणि आठ लहान उपग्रहांसह PSLV-54/EOS-06 मिशनचे प्रक्षेपण केले. PSLV-54 ने ओशनसॅट-3 आणि आठ मिनी उपग्रह प्रक्षेपित केले - पिक्सेल, भूतानसॅटमधून 'आनंद', ध्रुव स्पेसमधून दोन थायबोल्ट आणि स्पेसफ्लाइट यूएसएमधून चार अ‍ॅस्ट्रोकास्ट यात यांचा समावेश होता.

भूतानची अवकाशात भारताच्या मदतीने झेप

भूतानसॅट हा भारत आणि भूतानचा संयुक्त उपग्रह आहे. हा नॅनो उपग्रह आहे. भूतानसॅटमध्ये रिमोट सेन्सिंग कॅमेरे आहेत. या उपग्रहामुळे रेल्वे ट्रॅक बनवणे, पूल बांधणे आदी विकासकामांना मदत होणार आहे.

ओशनसॅट पहिल्यांदा 1999 मध्ये लॉन्च करण्यात आले होते ओशनसॅट-1 1999 मध्ये पहिल्यांदा लॉन्च करण्यात आले होते. यानंतर 2009 मध्ये त्याचे ओशनसॅट-2 अवकाशात स्थापित करण्यात आले. Oceansat-2 चे स्कॅनिंग स्कॅटरोमीटर अयशस्वी झाल्यानंतर 2016 मध्ये ScatSat-1 लॉन्च करण्यात आले. हे ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहनचे (PSLV) 56 वे उड्डाण आहे आणि 6 PSOM-XL सह PSLV-XL आवृत्तीचे 24 वे उड्डाण आहे.

याचा अभ्यास करण्यास मदत

ओशनसॅट मालिकेतील उपग्रह हे पृथ्वी निरीक्षण उपग्रह आहेत, जे समुद्रशास्त्रीय आणि वातावरणीय अभ्यासासाठी वापरले जातात. हे उपग्रह सागरी हवामानाचा अंदाज लावण्यासही सक्षम आहेत.