Naba Kishore Das: ओडिशाचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री नाबा किशोर दास (Minister Naba Das Passed Away) यांच्यावर एका सहायक उपनिरीक्षकाने गोळ्या झाडल्या.
Odisha Minister Naba Das Death: ओडिशाचे आरोग्यमंत्री नाबा किशोर दास (Health Minister Nab Kishore Das) यांच्यावर गोळीबार झाला होता. एका पोलीस अधिकाऱ्याने नाबा किशोर दास (Naba Kishore Das) यांच्यावर गोळीबार केला होता. या घटनेत ते गंभीर जखमी झाले होते. नाबा किशोर दास ब्रजराजनगरमध्ये एका कार्यक्रमाला जात असतानाच पोलीस अधिकाऱ्याने त्यांच्यावर (odisha health minister shot) गोळ्या झाडल्या. त्यानंतर आता त्यांचं निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. (odisha health minister naba das passed away after bullet injury he Died during treatment in hospital)
ओडिशाचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री नाबा किशोर दास यांच्यावर एका सहायक उपनिरीक्षकाने गोळ्या झाडल्या. रविवारी ओडिशातील झारसुगुडा जिल्ह्यातील गांधी चौकात पोलिसांच्या गणवेशातील एएसआयने आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने मंत्र्यांवर गोळीबार केला. मंत्री नाबा दास यांची गाडी थांबली असता कार्यकर्त्यांना त्यांना हार घातला. तितक्यात पोलीस अधिकाऱ्याने त्यांच्या छातीत गोळी झाडली. गोळी लागल्याचे कळताच दास पुन्हा गाडीत बसले आणि पुन्हा बाहेर आले. यानंतर घटनास्थळी एकच खळबळ उडाली.
#Odisha- Visuals from inside Apollo hospital in #Bhubaneswar. Health Minister #NabaDas was shot at by a police personal and was airlifted from #Jharsuguda.
CM #NaveenPatnaik also seen in the video. pic.twitter.com/8YGcrn0VvP— Tazeen Qureshy (@TazeenQureshy) January 29, 2023
पोलीस कर्मचाऱ्याने नबा दासवर 5 राऊंड फायर केले आहेत. गोळी लागल्यानंतर दास यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आलं होतं. मात्र आता त्यांच्या निधनाची बातमी (Odisha health minister naba das passed away) समोर येतेय.
दरम्यान, नाबा दास हे ओडिसामधील (Odisa) प्रभावशाली नेते आणि दुसरे सर्वात श्रीमंत मंत्री (Rich Minister) आहेत. नाबा दास यांनी महिन्यात त्रिवेणी अमावस्येच्या मुहूर्तावर महाराष्ट्रातील शनी शिंणापूर मंदिराला (Shani Shinnapur Mandir) 1 कोटींपेक्षा जास्त किंमतीचं 1.7 किलो सोनं आणि 5 किलो चांदीचा कलश दान केला होता.