Ambadas Danve Suspension: विधानसभेत शिवराळ भाषा वापरणे अंबादास दानवे यांना महागात पडले आहे. त्यांच्यावर 5 दिवसांच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. चंद्रकांत पाटील यांनी दानवेंच्या 5 दिवसांसाठी निलंबनाचा ठरवा मांडला. यावर सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
दानवेंवर निलंबनाची कारवाई केल्यानंतर विरोधी पक्ष आक्रमक झालाय. विरोधी पक्षाचे आमदार वेलमध्ये एकत्र झाले होते. बाजू मांडण्याची संधी द्यावी असे ते म्हणत आहेत. सभापती हाय हाय, न्याय द्या .. न्याय द्या अशी घोषणाबाजी करण्यात आली. विरोधकांनी कामकाजावर बहिष्कार टाकत ते सभागृहातून बाहेर गेले. तरीही कामकाज सुरुच राहिले. निलंबन झाल्याने त्यावर बोलता येणार नाही. अशा ठरावावर कधीही चर्चा झाली नाही असे यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणले.
शिवीगाळ करणे योग्य नाही. असे अपशब्द वापरणाऱ्याचे निलंबन करायला हवे हे शहाणपण गिरीश महाजनांना तेव्हा का सुचले नाही जेव्हा रमेश बिधूडी नावाचा खासदार दानिश आली बद्दल अत्यंत अभद्र भाषेत बोलत होता. किंवा संजय शिरसाट अब्दुल सत्तार यांच्यासारखी माणसं महिलांबद्दल गलिच्छ भाषेत बोलत होती.
— SushmaTai Andhare (@andharesushama) July 2, 2024
सर्वोच्च सभागृहात अशोभनीय वर्तन आहे. त्यामुळे विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्यावर 5 दिवस निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे निलम गोऱ्हे यांनी म्हटले. गटनेत्याच्या बैठकीत यावर चर्चा झाली त्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली होती..आपण दुःखी अंतःकरणाने हा निर्णय घेतला आहे. विरोधी पक्षानेही आमची भूमिका समजून घ्यावी, असे उपसभापती म्हणाल्या.