मुंबई : इस्त्रोने चंद्रयान-2 चे ऑर्बिटरचे हाय रिझोल्यूशन कॅमेरेतून चंद्राचे फोटो जाहीर केले आहेत. या हाय रिझोल्यूशन कॅमेऱ्यातून चंद्राचे फोटो शेअर केले आहे. या फोटोत चंद्रासोबत लहान आणि मोठे खड्डे दिसत आहेत.
इस्त्रोने म्हटल्याप्रमाणे, आर्बिटरमध्ये असलेल्या यंत्रणेने चंद्रावर असलेल्या तत्वांवर अनेक सूचना पाठवल्या आहेत. आर्बिटर आता चंद्रावर असलेल्या कणांबाबत माहिती गोळा करत आहेत. तसेच ऑर्बिटरच्या यंत्रणेने आपल्या तपासणीमध्ये चंद्रावरील मातीत असणाऱ्या कणांची देखील माहिती गोळा केली आहे. महत्वाचं म्हणजे हे तेव्हा शक्य झालं जेव्हा सुर्याच्या तेज प्रकाशातील एक्स किरण जेव्हा चंद्रावर पडली.
#ISRO
Have a look at the images taken by #Chandrayaan2's Orbiter High Resolution Camera (OHRC).
For more images please visit https://t.co/YBjRO1kTcL pic.twitter.com/K4INnWKbaM— ISRO (@isro) October 4, 2019
इस्त्रोच्या माहितीनुसार, ऑर्बिटर आपल्या ठरलेल्या हेतूपर्यंत पोहण्यासाठी चांगल्याप्रकारे काम करत आहे. विक्रमच्या शोधात आणि संपर्कात राहण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या नासाने सांगितलं आहे की, अजूनपर्यंत विक्रमकडून कोणताही आकडा मिळालेला नाही. खगोलशास्त्रज्ञ स्कॉट टायलीने ट्विट करून विक्रमसोबत संपर्क होऊ शकतो अशी प्रबळ संभावना व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटलं की, विक्रम शोधण्यात नक्कीच यश मिळेल.
इस्त्रोतील एका वैज्ञानिकाने सांगितल्याप्रमाणे, आता विक्रमशी संपर्क करणे कठीण आहे. पण प्रयत्न करायला काहीच हरकत नाही. चंद्रावर रात्री खूप थंड वातावरण असताना विक्रमशी संपर्क करणं योग्य राहिल का? तेव्हा त्यांनी सांगितलं, फक्त थंडीच नाही तर एखादा झटका देखील चिंतेचे कारण बनू शकते. कठिण लँडींगमुळे विक्रम जोरात चंद्रावर पडला असेल यामुळे आतील उपकरणांच नुकसान झालं असेल.