तुम्हाला फेऱ्या मारायला लावणारे अधिकारी जेव्हा एका बकरीमागे पळतात तेव्हा...

एक बकरी जेव्हा शासकीय कार्यालय डोक्यावर घेते तेव्हा.... तुम्हा आम्हाला जे जमलं नाही ते बकरीनं करून दाखवलं... पाहा व्हिडीओ

Updated: Dec 3, 2021, 09:38 PM IST
तुम्हाला फेऱ्या मारायला लावणारे अधिकारी जेव्हा एका बकरीमागे पळतात तेव्हा...

कानपूर: एखादं छोटं जरी काम असेल तरी सरकारी कार्यालयात हजार खेट्या घातल्याशिवाय आपलं काम होईल तर शप्पत असं म्हणायची वेळ येते. एरवी सर्वसामान्य नागरिकांना कागदपत्रासाठी पळायला लावणाऱ्या अधिकाऱ्यांनाच एक बकरीनं अद्दल घडवली आहे. 

या बकरीनं चक्क सरकारी कार्यालयात घुसून महत्त्वाची कागदपत्र तोंडात घेऊन पळ काढला. या बकरीनं अधिकाऱ्यांची तर भंबेरी उडवली. या अधिकाऱ्यांना पळताभुई थोडं केलं. बकरी महत्त्वाची कागदपत्र घेऊन पळत सुटली. अधिकारी तिचा पाठलाग करत सुटले. 

हा सगळा प्रकार बराचवेळ सुरू होता. एरवी इतरांना पाळयला लावणारे सरकारी कर्मचारी एका बकरीमागे कागदपत्रांसाठी पळताना दिसले. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. 22 सेकंदाच्या या व्हिडीओला 4 हजारहून अधिक लाईक्स देखील मिळाले आहेत. तर अनेक युजर्सनी आनंद व्यक्त केला आहे. 

ही घटना कानपूरमधील सरकारी कार्यालयातील असल्याचा दावा केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. झी 24 तास या व्हिडीओची पुष्टी करत नाही.