संजीत खन्ना, नई दिल्ली: : दिल्लीत सुधारित कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेले शेतकरी आंदोलन (Farmer's Protest) पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. शेतकरी आंदोलनात सहभागी असलेल्या लोकांना एका व्यक्तीला जिवंत जाळल्याची घटना घडली आहे. मृत व्यक्तीचे नाव मुकेश असून हरियाणाच्या बहादुरगढ येथील कसार गावचा रहिवासी आहे. मुकेशने शेतकरी आंदोलनातील काही लोकांसोबत मद्य प्राशन केले होते. त्यानंतर मुकेश आणि इतर आंदोलनकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर ही घटना घडल्याची माहिती मिळत आहे.
शेतकरी आंदोलनात गेलेल्या मुकेशवर तेल ओतून जाळण्यात आले. त्यानंतर गडबडीत त्याला रुग्णालयात नेण्यात आले. उपचारानंतर काहीच तासात मुकेशचा मृत्यू झाला.
केंद्र सरकारच्या विरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात मुकेशने स्वतःहून जाळून घेतले. असं आंदोलनकर्ते भासवण्याचा प्रयत्न करीत होते. परंतु खरे तर आपसातील भांडणामुळे मुकेशची जाळून हत्या करण्यात आली.