Election 2024 : वन नेशन, वन इलेक्शन (One Natione One Election). म्हणजे देशभरात एकाचवेळी लोकसभा (Loksabha) आणि सर्व विधानसभा (Vidhansabha) निवडणुका घ्यायच्या. वारंवार होणाऱ्या निवडणुका, आचारसंहितेमुळं (Code of Conduct) विकासकामांना (Development Work) बसणारी खीळ आणि निवडणुकांवरचा वाढता खर्च लक्षात घेता लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याची मागणी होतेय.. केंद्रीय निवडणूक आयोगही (Election Commission of India) वन नेशन, वन इलेक्शनसाठी तयार आहे. मात्र याबाबतचा धोरणात्मक निर्णय केंद्र सरकारनं (Central Government) घ्यावा, असं सांगत मुख्य निवडणूक आयुक्तांनी (Election Commissioner) चेंडू केंद्र सरकारच्या कोर्टात टोलवलाय.
दरम्यान, भाजपनं (BJP) वन नेशन, वन इलेक्शनचं स्वागत केलंय. तर याबाबत निवडणूक आयोगानं शंकांना जागा ठेवू नये, अशी अपेक्षा काँग्रेसनं व्यक्त केलीय.
2024 साली देशात लोकसभा निवडणुका होणार आहेत, तर त्याचवर्षी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकाही होतील. वर्षातून दोनवेळा मतदान करण्याऐवजी एकाचदिवशी मतदान झालं, तर ते सगळ्यांच्याच सोयीचं ठरेल...मात्र यावर केंद्र सरकार काय भूमिका घेणार आणि विरोधक सहजासहजी हा निर्णय़ स्वीकारणार का? यावर सारंकाही अवलंबून आहे.