मुंबई : मालदीवची राजधानी माले येथील एका घराला लागलेल्या घराला 8 भारतीयांना मृत्यू झाला आहे. गुरुवारी घडलेल्या या घटनेत एकूण 10 जणांचा मृत्यू झालाय. तर अनेक जण जखमी झाले आहेत. मालदीवमधील भारतीय उच्चायुक्तांनी घटनेवर दु:ख व्यक्त केलं आहे.
घराला लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना 4 तास लागले. आगी विझवल्यानंतर घरात 10 मृतदेह आढळले. या ठिकाणी बाहेर पडण्यासाठी कोणतीही जागा नसल्याचे या लोकांचा मृत्यू झाला.
सकाळी साडेबाराच्या सुमारास ही आग लागली. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. आगीत 10 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. ज्यामध्ये 8 भारतीय आहेत तर इतर 2 नागरिक कुठले होते हे अजून समोर आलेले नाही.
मालदीव हे अनेक पर्यटकांचं आवडतं पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी बांगलादेश, भारत, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंकेतील लोकं देखील मोठ्या प्रमाणात येतात. मालदीवची अर्थव्यवस्था ही पर्यटनावर अवलंबून आहे.