नवी दिल्ली : digital profile :आता एक सर्वसामान्यांसाठी चांगली बातमी. सरकारने एकाच आयडीवर सरकारच्या सर्व योजनांचा लाभ घेता येणार आहे, अशी योजना आखली आहे. ही योजना ऑगस्ट महिन्यात कार्यान्वीत होणार आहे. (One Profile for All Services: Center government soon to create digital profile for every citizen)
केंद्र सरकार तसेच राज्य सरकारच्या प्रत्येक योजनेचा लाभ घेण्यासाठी एकच डिजिटल प्रोफाईल असणार आहे. या योजनेच्या माध्यमातून एकाच आयडीवर हे काम चालणार आहे. 'सिंगल साईन ऑन' आयडीद्वारे सर्व प्रकारच्या सरकारी सेवांचा लाभ घेता येणार आहे.
सरकारच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी एकापेक्षा अधिक लॉगिन आयडी तसेच पासवर्ड लक्षात ठेवण्याची गरज नाही, असेही केंद्र सरकारने म्हटले आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व योजनांचे एकत्रीकरण करण्यासाठी नवीन अॅप सुरु केलेय.
या अॅपवर आपल्याला वर्षातून एकदाच नोंदणी करावी लागणार आहे. त्यानंतर एकाच मेल आयडीद्वारे प्रत्येक प्रकारच्या योजनेचा लाभ घेता येणार आहे. सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला आधीच यामध्ये फॉर्म भरवा लागणार आहे. त्यानंतर आपल्याला कोणत्याही सुविधेसाठी अर्ज करायचा असल्यास फॉर्म उघडताच अर्जदाराशी संबंधित सर्व माहिती वेगवेगळ्या कॉलममध्ये आपोआप भरली जाईल आपल्याला फक्त OK बटणावर क्लिक करावे लागणार आहे.
सरकारच्या या नव्या पोर्टलवर शाळा आणि महाविद्यालयीन प्रवेश, शैक्षणिक प्रमाणपत्र, शिष्यवृत्ती अर्ज, वीज-पाणी बिल जमा करणे, रेल्वे - विमान तिकीट, मालमत्ता कर, प्राप्तिकर रिटर्न, जीएसटी रिटर्न भरणे, व्यवसाय परवानगी आणि व्यवसाय मान्यता मिळणार आहे. तसेच स्टार्टअप नोंदणी यासंबंधीच्या सुविधाही मिळणार याच्यामाध्यमातून मिळणार आहे.
तसेच या सुविधांसोबत पासपोर्ट, आधार, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, गॅस कनेक्शन, वाहन परवाना, रेशनकार्ड, विवाह-जन्म-मृत्यू प्रमाणपत्र, पीएफ, शस्त्र परवाना आणि व्यापार परवाना याही सुविधाही मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.