ओएनजीसीमध्ये वेगवेगळ्या श्रेणीतील ७४७ पदांसाठी भर्ती

या नोकरीसाठी ऑनलाईन अर्ज केले जाऊ शकतील

Updated: Jan 30, 2019, 04:38 PM IST
ओएनजीसीमध्ये वेगवेगळ्या श्रेणीतील ७४७ पदांसाठी भर्ती title=

मुंबई : दहावी, बारावी आणि पदवीधरांसाठी देशातील सर्वात मोठी तेल कंपनी अर्थात 'ऑइल ऍन्ड नॅचुरल गॅस लिमिटेड'मध्ये (ONGC) ७४७ पदांसाठी भर्ती होणार आहे. ज्युनिअर सिक्युरिटी सुपरवायजर, ज्युनिअर फायर सुपरवायजर, हेल्थ अटेंडन्ट, नर्स आणि ड्रायव्हर अशा विवध पदांसाठी ही भरती होतेय. यामध्ये तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतीही साधारण: योग्यता धारण केलेली व्यक्ती अर्ज करू शकतील. सरकारी नोकरी असल्यामुळे पगाराचीही चिंता नाही. कारण साधारण पदांसाठीही चांगला पगार दिला जातोय... तेही सरकारी सुविधांसहीत...

ऑनलाईन अर्ज करा

या नोकरीसाठी ऑनलाईन अर्ज केले जाऊ शकतील. ३१ जानेवारी ते २० फेब्रुवारीपर्यंत यासाठी तुम्हाला अर्ज सादर करावे लागतील. कंपनीच्या वेबसाईटवर संपूर्ण माहिती देण्यात आलीय. यामध्ये तीन श्रेणी देण्यात आल्यात.

ए-२ श्रेणी

बेसिक पगार १२,००० ते २७,००० पर्यंत म्हणजेच महिन्याला जवळपास ३१,५०० रुपये तुमच्या हातात पडतील. सोबतच वार्षिक पगारवाढ, बेसिक पगाराच्या ४७ टक्के अलावन्स, घरभाडं, महागाई भत्ताही मिळेल. तुम्हाला आणि कुटुंबीयांना औषधोपचाराचा खर्चासहीत इतर अनेक सुविधांचा फायदा मिळेल.

ए-१ श्रेणी

बेसिक पगार ११,००० ते २४,००० पर्यंत म्हणजेच महिन्याला जवळपास २९,००० रुपये तुमच्या हातात पडतील. सोबतच ३ टक्के वार्षिक पगारवाढ, बेसिक पगाराच्या ४७ टक्के अलावन्स, घरभाडं, महागाई भत्ताही मिळेल. तुम्हाला आणि कुटुंबीयांना औषधोपचाराचा खर्चासहीत इतर अनेक सुविधांचा फायदा मिळेल.

डब्ल्यू-१ श्रेणी

यामध्ये, बेसिक पगार १०,००० ते १८,००० पर्यंत म्हणजेच महिन्याला जवळपास २६,५०० रुपये तुमच्या हातात पडतील. सोबतच ३ टक्के वार्षिक पगारवाढ, बेसिक पगाराच्या ४७ टक्के अलावन्स, घरभाडं, महागाई भत्ताही मिळेल. तुम्हाला आणि कुटुंबीयांना औषधोपचाराचा खर्चासहीत इतर अनेक सुविधांचा फायदा मिळेल.

७४७ पदांसाठी भर्ती

ए-२ श्रेणीसाठी ३०१ जागा, ए-१ श्रेणीसाठी ४२८ जागा आणि डब्ल्यू-१ श्रेणीसाठी ८ जागांवर भर्ती होणार आहे. यातील बहुतेक जागा आऊटडोअर कामांसाठी आहेत. तसंच देशभरात गरजेनुसार, उमेदवारांची कुठेही बदली होऊ शकते.

इथे भरा ऑनलाईन अर्ज

ONGC साठी पहिली लिंक ओपन करा

ONGC साठी दुसरी लिंक ओपन करा