आठवड्याला 3 दिवस सुट्ट्या, या कंपनीची कर्मचाऱ्यांना खूशखबर

आठवड्याला फक्त 4 दिवस करावे लागणार काम.

Updated: May 13, 2021, 03:11 PM IST
आठवड्याला 3 दिवस सुट्ट्या, या कंपनीची कर्मचाऱ्यांना खूशखबर title=

मुंबई : हॉस्पिटॅलिटी सेक्टरशी जोडलेली कंपनी ओयोमध्ये काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज आहे. कारण या कर्मचाऱ्यांना आता तीन दिवस सुट्टी मिळणार आहे. कंपनीचे संस्थापक आणि ग्रुप सीईओ रितेश अग्रवाल यांनी ही घोषणा केली आहे. त्यांनी सांगितले की, कंपनीने चार दिवसांचा आठवडा प्रणाली स्वीकारली आहे. त्याच्याबरोबर कंपनीची एक वेगळीच पेड लीव्ह देखील सुरु केली आहे. अग्रवाल यांनी सांगितलं की, कर्मचारी आठवड्यातून कधीही सुट्टी घेऊ शकतात. फक्त त्यांना आधी मॅनेजरला याबाबत माहिती द्यावी लागेल.

ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं की, 'जेव्हा कधी पाहिजे असेल तेव्हा सुट्टी घ्या. त्यासाठी लॉग इन करणे आवश्यक नाही. फक्त मॅनेजरला माहिती द्या कोणतीही कारण सांगण्याची गरज नाही. आम्ही बिजनेसवर पडणारा प्रभाव आणि डेडलाईनवर जोर देत नाही. आम्ही मानतो की ओयो कर्मचारी जर अधिक फोक्सड, एफिशिएंट आणि प्रोडक्टिव काम करतील. तर कामकाज कधीच बाधित होणार नाही.'

'कोविड-19 मुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे आपल्या लोकांसोबत अधिक वेळ घालवणं महत्त्वाचं आहे, स्टार्टअप आणि इतर मोठ्या कंपन्यांप्रमाणे आम्ही देखील काही बदल केले आहेत.'

'आजपासून 4 दिवसांचा वर्क विक लागू केला जाईल. पण हा थोडा वेगळा असेल. OYO मध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला आठवड्यात एकदा कधीही एक दिवस सुट्टी मिळेल. 'No Questions Asked Flexible Infinite Paid Leaves' ची देखील सुरुवात केली जाईल.

OYO Hotels & Homes च्या प्लॅटफॉर्मवर सध्या 80 देशातील 800 शहरातील एक लाख हॉटेल आणि होमओनर्स आहेत.