close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

पाकिस्तानतर्फे शस्त्रसंधीचे उल्लंघन, भारताचे जशास तसे उत्तर

 पाकिस्तान आपल्या कारवायांपासून मागे हटण्यास तयार नाही.

Updated: Sep 21, 2019, 11:49 AM IST
पाकिस्तानतर्फे शस्त्रसंधीचे उल्लंघन, भारताचे जशास तसे उत्तर

श्रीनगर : पाकिस्तान आपल्या कारवायांपासून मागे हटण्यास तयार नाही. त्यांच्यातर्फे पुन्हा एकदा सीमारेषेचे उल्लंघन केले. पाकिस्तानतर्फे पुंछ येथील शाहपूर आणि किरनी सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन केले गेले. भारतीय सैन्याने पाकिस्तानला याचे जशास तसे उत्तर दिले आहे. 

पाकिस्तानतर्फे वारंवार सीमारेषेचे उल्लंघन होत आहे. याआधी सोमवारी पाकिस्तानतर्फे सीमारेषे शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. मेंढार सेक्टरच्या बालाकोट ब्लॉकमध्ये रविवारी रात्री साधारण साडे दहा वाजता गोळीबार झाला. 

कोणत्याही प्रकारची सुचना न देता पाकिस्तानतर्फे वारंवार गोळीबार होत असल्याची माहीती एका अधिकाऱ्याने दिली. पाकिस्तानी सैन्याने छोट्या शस्त्रांनी गोळीबार केला त्यास सैन्याने तात्काळ उत्तर दिल्याचेही ते म्हणाले.