इम्रान खान यांचे भारतीय सैन्यावर गंभीर आरोप

 भारतीय सेनेच्या कारवाईत निष्पाप नागरिक मारले गेल्याचा आरोप इम्रान खान यांनी केला आहे. 

Updated: Aug 4, 2019, 05:51 PM IST
इम्रान खान यांचे भारतीय सैन्यावर गंभीर आरोप  title=

नवी दिल्ली : एलओसीवर पाकिस्तानकडून झालेली घुसखोरी उधळून लावत भारतीय सैन्याने पाकिस्तानी बॅट (बॉर्डर एक्शन टीम)च्या 7 सैनिकांना ठार केले. यानंतर पाकिस्तानात हाहाकार माजला. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी इस्लामाबाद येथे राष्ट्रीय सुरक्षा समिती (NSC) ची बैठक बोलावली. यानंतर इम्रान खान यांनी सलग ट्वीट करण्यास सुरुवात केली. भारतीय सेनेच्या कारवाईत निष्पाप नागरिक मारले गेल्याचा आरोप इम्रान खान यांनी केला आहे. 

भारतीय सीमारेषेवर सातत्याने होणारी घुसखोरी रोखण्यासाठी जशास तसे उत्तर दिले जात आहे. पाकिस्तानने या कारवाई संदर्भात भारतीय उच्चायोगाला मध्ये घेतले आहे. भारतातर्फे झालेल्या गोळीबारात दोन नागरिक कथित स्वरूपात ठार झाल्याचे पाकिस्तानतर्फे सांगितले जात आहे. 

एलओसीवर भारताच्या कारवाईत दोन निष्पापांचा जीव गेल्याच्या घटनेचा मी निषेध करतो असे इम्रान खान यांनी म्हटले आहे. भारतीय सेनेने सीमेवर क्लस्टर बॉम्बचा वापर केला. 1983 कन्वेंशनच्या मानवतावादी कायद्याचे उल्लंघन भारताने केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. शांती आणि सुरक्षेसाठी UNSC ला याकडे लक्ष द्यायला हवे असे ते म्हणाले.