पाकिस्तानच्या दाव्याची भारताकडून पोलखोल, दहशतवादी तळांवर हल्ले करणार!

पाकिस्तानला भारत चोख प्रत्युत्त देईल, असा इशारा तिन्ही संरक्षण दल प्रमुखांनी पत्रकार परिषदेत दिला.

Updated: Feb 28, 2019, 09:56 PM IST
पाकिस्तानच्या दाव्याची भारताकडून पोलखोल, दहशतवादी तळांवर हल्ले करणार! title=

नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान हद्दीद घुसून बालाकोट येथील दहशतवादी अड्ड्यावर हल्ला चढवला. तो उद्धवस्थ केला. त्यानंतर पाकिस्तानने भारतीय हद्दीत घुसखोरी करत भारतीय लष्करी ठाण्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारताने पाकिस्तानचा हा प्रयत्न हाणून पाडला आहे. सध्या काश्मीर आणि सीमारेषेवर तणाव आहे. भारताची कारवाई ही दहशतवादाविरोधात आहे. जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादी कारवायांना खतपाणी घालत राहणार, तोपर्यंत आम्ही पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादी तळांवर हल्ले करु, असा इशारा आणि निर्धार भारतीय लष्कर, हवाई दल आणि नौदलाने आज संयुक्त पत्रकार परिषदेत केला. त्याचवेळी कोणत्याही प्रकारच्या हल्ल्याचा प्रतिकार करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, असेही स्पष्ट करताना पाकिस्तानला इशारा दिला आहे. दरम्यान, भारताच्या तिन्ही दलानी पाकिस्तानच्या दाव्याची पोलखोल केली आहे. भारताच्या लष्करी तळांवर हल्ले केले नाहीत. एफ-१६ विमानाचा वापर झालेलाच नाही, असा दावा पाकिस्तानकडून करण्यात आला. मात्र, हे दावे कसे चुकीचे होते, याची माहिती भारतीय तिन्ही दलाच्या प्रमुखानी दिली. 

'दहशतवाद्यांविरोधात कारवाई करणारच'

सैन्याच्या तिन्ही दलाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त पत्रकार परिषद सुरू आहे. भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर ही पत्रकार परिषद घेण्यात आली आहे. भारतीय वायुसेनेच्या माऱ्यामुळे कोसळलेल्या पाकिस्तानच्या एफ १६ लढाऊ विमानाच्या अवशेषांचे फोटो जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे पाकिस्तान सैन्याचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी दिलेल्या खोट्या विधानांची पोल खोल झाली आहे. त्यांनी म्हटले होते की एफ १६ लढाऊ विमान भारतीय हद्दीत गेलेच नाही. कारण त्याचा वापर केला नव्हता. मात्र, भारतीय वायुसेनेने पाडलेल्या विमानाचे फोटो हाती आले आहेत.  पाकिस्तानचे एफ १६ हे विमान पाडले आहे. तरीही पाकिस्तानकडून दिशभूल करण्यात येत आहे. पाकिस्तानकडून सतत शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरूच आहे. पाकिस्तानला काय हवे आहे, हे त्यांनी ठरवावे, असे भारती लष्कराने पाकिस्तानला ठणकावले आहे. पाकिस्तान दहशतवाद्यांना पाठिंबा देत राहणार तोपर्यंत आम्ही दहशतवाद्यांविरोधात कारवाई करत राहणार, असे लष्कराने इशारा देताना स्पष्ट केले.

भारतीय लष्कराकडून पाकिस्तानची पोलखोल

भारताच्या तिन्ही दलानी पाकिस्तानच्या दाव्याची पोलखोल केली आहे. भारताच्या लष्करी तळांवर हल्ले केले नाहीत. एफ-१६ विमानाचा वापर झालेलाच नाही, असा दावा पाकिस्तानकडून करण्यात आला. मात्र, हे दावे कसे चुकीचे होते, याची माहिती भारतीय तिन्ही दलाच्या प्रमुखानी दिली. प्रत्येक विमानाचा एक इलेक्ट्रॉनिक सिग्नल असतो. भारतीय संरक्षण दलांना मिळालेला सिग्नल एफ -१६ सोबत जुळतो. आम्हाला विमान आणि मिसाईलचे अवशेषही सापडले आहेत. आमराम मिसाईल वाहून नेण्याची क्षमता केवळ एफ १६ विमानांमध्ये आहे. त्यामुळे पाकिस्तानने एफ १६ विमानाचा वापर झाला होता, हे सिद्ध होते, असे भारताकडून स्पष्ट करण्यात आले आहे. भारतीय लष्कर कोणत्याही परिस्थितीसाठी सज्ज आहे. भारत चोख प्रत्युत्त देईल, असा इशारा तिन्ही संरक्षण दल प्रमुखांनी पत्रकार परिषदेत दिला. 

पत्रकार परिषद

- भारतीय लष्कर कोणत्याही परिस्थितीसाठी सज्ज आहे.
- पाकिस्तानने हल्ल्यासाठी एफ-१६ विमानाचा प्रयत्न केला. विमानाचे अवशेष सापडले, हवाई दलाची माहिती
- पाकिस्तानकडून सतत शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरूच आहे. पाकिस्तानला काय हवे आहे, हे त्यांनी ठरवावे, असे भारती लष्कराने ठणकावले
- पाकिस्तान दहशतवाद्यांना पाठिंबा देत राहणार तोपर्यंत आम्ही दहशतवाद्यांविरोधात कारवाई करत राहणार - लष्कर
- पाकिस्तानने २७ फेब्रुवारीला भारतीय लष्कराच्या तळावर हवाई हल्ल्याचा प्रयत्न केला. आम्ही पाकचा हल्ला परतवून लावला - वायुदल
- पाकिस्तानने भारतीय लष्करी ठाण्यांना लक्ष्य केले - भारत
- २७ फेब्रुवारी पाकिस्तान विमानांकडून घुसखोरी
- हवाई हल्ल्याचे पुरावे देणार
-  पाकिस्तानचे एफ १६ हे विमान पाडले
- पाकिस्तानकडून दिशभूल करण्यात येत आहे
- पाकिस्तानने चुकीची माहिती दिली आहे.
- पाकिस्तानने भारतीय लष्कराला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला.
- भारताने पाकिस्तानची ही घुसखोरी हाणून पाडली आहे.