Aamir liaquat hussain Death : आमिर लियाकतच्या तीन बायका कोण? मृत्यूपूर्वी तिघांना काय सांगितलं

 पाकिस्तानचे टीव्ही होस्ट आणि खासदार डॉ. अमीर लियाकत यांचे गुरूवारी निधन झाल्याची घटना घडलीय. 

Updated: Jun 9, 2022, 10:26 PM IST
Aamir liaquat hussain Death : आमिर लियाकतच्या तीन बायका कोण? मृत्यूपूर्वी तिघांना काय सांगितलं  title=

इस्लामाबाद : मीम्समधून भारतात कायम चर्चेत असणारे पाकिस्तानचे टीव्ही होस्ट आणि खासदार डॉ. अमीर लियाकत यांचे गुरूवारी निधन झाल्याची घटना घडलीय. आमिर लियाकत हुसैन टीव्ही होस्ट म्हणून प्रसिद्ध होतेच परंतु सोशल मीडियावर त्यांचे व्हिडिओ आणि मीम्स प्रचंड व्हायरल झाले आहेत. मीम्समुळं भारतात ते ओळखीचा चेहरा झाले होते. व्हायरल मीम्ससोबत अमीर लियाकत त्यांच्या तीन लग्नामुळे आणि घटस्फोटामुळे नेहमीच चर्चेत होते. जाणून घेऊयात लियाकतच्या तीन बायका कोण होत्या ? आणि मृत्यूपूर्वी तिघा बायकांबाबत आमीर काय म्हणाले होते.  

बायकांसाठी शेवटची पोस्ट 
मृत्यूच्या काही दिवस आधी आमिरने त्याच्या तीन पत्नींचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले होते. हे फोटो शेअर करत त्याने सर्व काही संपल्याचे सांगितले. पोस्टमध्ये लिहले होते, हे तुम्हा तिघांसाठी आहे. पहिल्या लग्नापेक्षा त्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या लग्नाचा जास्त राग आहे. त्याने त्याच्या तिसऱ्या पत्नीसाठी #DangerousIsThird देखील वापरले होते. यासोबत आमिरने एक दु:खी गाणेही शेअर केले, ज्यामध्ये त्याच्या बायकांनी त्याची कधीही काळजी घेतली नाही हे सांगितले होते.

पहिली बायको 
आमिरने पहिले लग्न बुशरा इक्बालशी केले. बुशरा इक्बाल या शिक्षिका आहेत. त्याचे स्वतःचे यूट्यूब चॅनल देखील आहे. आमिर यांना बुशरापासून एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुले आहेत.मात्र, आमिरने 2020 मध्ये बुशराला घटस्फोट दिला. या घटस्फोटावर बुशरा म्हणाली होती, "मला घटस्फोट देणं ही एक गोष्ट आहे, पण माझ्यासाठी ती खूप वेदनादायक आणि धक्कादायक होती." मी स्वतःला अल्लाहला दिले आहे.

दुसरी बायको 
आमिरने 2018 मध्ये पाकिस्तानी अभिनेत्री तुबा अन्वरसोबत दुसरे लग्न केले होते. 2020 मध्ये त्याचे हे दुसरे लग्नही तुटले. अनेक अनुमानांनंतर घटस्फोटाची पुष्टी झाली.

तिसरी बायको
आमिरने दानिया शाहसोबत तिसरे लग्न केले.फेब्रुवारी 2022 मध्ये लियाकतने 18 वर्षीय सय्यदा दानिया शाहसोबत लग्न केले. मात्र तीन महिन्यांनंतरच दानियाने आपल्यावर अनेक गंभीर आरोप करत घटस्फोटासाठी न्यायालयात धाव घेतली होती. 

दानियाची आई सलमा बेगम यांनी जिओ न्यूजला सांगितले की, दोघांचा अद्याप घटस्फोट झालेला नाही.सध्या हे प्रकरण न्यायालयात आहे. न्यायालयाने दोघांना समेटाची संधी दिली. जर सरकारने त्यांच्या कुटुंबाला सुरक्षा पुरवली तर ते कराचीमध्ये लियाकतच्या अंत्यसंस्कारात सहभागी होतील, असे ते म्हणाले. सलमा बेगम म्हणाल्या, तो आमचा मुलगा आणि जावई आहे. दानिया शाह अजूनही त्यांची पत्नी आहे.