पाकिस्तानी युट्युबर भारतात फिरायला आला, हायवेवर अचानक संपलं पेट्रोल अन्...; पाहा Video

Pakistani Youtuber Viral Video: पाकिस्तानी युट्यूबर आणि बाईकस्वार अबरार हसन (Abrar Hassan) एका महिन्याच्या भारत दौऱ्यावर होता. प्रवासातील अनुभव त्याने त्याच्या यूट्यूब चॅनलवर शेअर केले आहेत. त्यावेळी त्याने एक किस्सा सांगितला.

Updated: Jun 17, 2023, 08:11 PM IST
पाकिस्तानी युट्युबर भारतात फिरायला आला, हायवेवर अचानक संपलं पेट्रोल अन्...; पाहा Video title=
Pakistani Youtuber In india Viral video

Pakistani Youtuber On India Tour: प्रत्येक व्यक्तीने आयुष्यात प्रवास (Travel) करणं गरजेचं आहे. प्रवासादरम्यान अनेक आंबट गोड अनुभवांचा सामना करावा लागतो. त्यातून अनेक गोष्टी शिकायला देखील भेटतात. अनेकांना आयुष्यात जग फिरण्याची इच्छा असते. मात्र ऑफिस, घर आणि पैसा या त्रिकूटातून सुटका होणं नाही. मात्र, काही फिरस्ते आपलं स्वप्न उराशी बाळगून फिरण्याची मजा घेत असतात. अशातच एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल (Viral Video) होत असल्याचं दिसतंय. एका पाकिस्तानी युट्यूबरचा (Pakistani Youtuber) हा व्हिडिओ आहे.

पाकिस्तानी युट्यूबर आणि बाईकस्वार अबरार हसन (Abrar Hassan) एका महिन्याच्या भारत दौऱ्यावर होता. भारतातील पंजाब, दिल्ली, हरियाणा, राजस्थान, मुंबई, केरळ या अनेक महत्त्वाच्या ठिकाणांना एका भेटीदरम्यान सुमारे 8000 किलोमीटरचे अंतर पार केलं. यादरम्यान त्यांना अनेक अनुभवांना सामोरं जावं लागलं. हे अनुभव त्याने त्याच्या यूट्यूब चॅनलवर शेअर केले आहेत. त्यावेळी त्याने एक किस्सा सांगितला.

आणखी वाचा - सॉली भैय्या... इंटरनेटवरचा सर्वात क्यूट Video, प्रत्येक भावाने बहिणीला पाठवावा

आपल्या खास अनुभवात तो, आग्रा ते दिल्ली महामार्गाचा उल्लेख केला करतो. आग्राहून दिल्लीला येत असताना एका अनोळख्या ठिकाणी त्याच्या बाईकचं पेट्रोल संपतं. त्यावेळी तिथं कोणीच ये जा करत नव्हतं. त्यामुळे आता आपलं काही खरं नाही, असं अबरारला वाटू लागलं. त्यावेळी एक वृद्ध व्यक्ती तिथं आला. हायवेपासून हाकेच्या अंतरावर एक पेट्रोल पंप आहे, असं या वृद्ध व्यक्तीने सांगितलं.

पाहा Video

विनय नावाच्या व्यक्तीने अबरारला मदत केली. दोघंही पेट्रोल पंपापर्यंत गेले आणि बाटलीत पेट्रोल घेतलं आणि नंतर गाडीत टाकलं आणि अबरार पुढे निघून गेला. अबरारने विनयचे आभार मानले. पेट्रोल पंपावर जाण्यासाठी रिक्षा मिळणं शक्य नव्हतं. तेव्हाच विनय भाई भेटला. तो आपल्या मुलाला सोडायला आला होता. त्यानं मला त्याच्या बाईकवर बसवलं आणि पेट्रोल पंपापर्यंत पोहोचवलं, असं म्हणत अबरारने विनय यांचे आभार मानले आहेत. विनय यांनी निष्पापपणे याला आपलं कर्तव्य आहे, असं म्हटलंय. यांचा हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.