Good News : आता या तारखेपर्यंत करता येणार Pan Card Aadhaar Card शी लिंक

तुम्ही जर पॅन कार्ड (Pan card) आधारशी (Aadhaar card) लिंक केले नसेल, तर तुमच्यासाठी ही मोठी दिलासादायक बातमी आहे. कारण पॅन कार्ड आधार कार्डला लिंक करण्याची मुदत पुन्हा एकाद वाढवण्यात आली आहे. आता ३० जून, २०२१ पर्यंत तुम्ही पॅन कार्ड आधारला जोडू शकता.

Updated: Mar 31, 2021, 08:14 PM IST
Good News : आता या तारखेपर्यंत करता येणार Pan Card Aadhaar Card शी लिंक title=

मुंबई : तुम्ही जर पॅन कार्ड (Pan card) आधारशी (Aadhaar card) लिंक केले नसेल, तर तुमच्यासाठी ही मोठी दिलासादायक बातमी आहे. कारण पॅन कार्ड आधार कार्डला लिंक करण्याची मुदत पुन्हा एकाद वाढवण्यात आली आहे. आता ३० जून, २०२१ पर्यंत तुम्ही पॅन कार्ड आधारला जोडू शकता.

पॅन आधारला लिंक करण्याची आजची शेवटची तारीख होती. त्यामुळे आज अचानक आयकर विभागाच्या संकेतस्थळावर मोठ्या प्रमाणावर लोक लिंक करण्यासाठी आले. परिणामी आयकर विभागाचा सर्व्हरच डाऊन झाला. त्यामुळे ही प्रक्रीया रखडली. 

आज जर पॅन कार्ड आधारशी लिंक केले नसते, तर उद्यापासून १००० रूपयाचा दंड होणार होता. मात्र सर्व्हरच डाऊन झाल्याने अनेकांनी मुदत वाढवून देण्याची मागणी केली. त्यानंतर आता केंद्र सरकारने ३० जूनपर्यंत पॅन कार्ड आधार कार्डला लिंक करण्याची मुदत वाढवून देण्यात आली आहे. 

Pan-Aadhar ला कसे कराल ऑनलाईन लिंक?

1. सगळ्यात आधी तुम्हाला Income tax e-Filing पोर्टलवर नोंदणी करावी लागेल. www.incometaxindiaefiling.gov.in 

2. या पोर्टलवर तुम्हाला आयडी, पासवर्ड आणि जन्म तारीख टाकावी लागेल. 

3. या साईटवर लॉग ईन केल्यावर एक नवी विंडो उघडेल, ज्यावर आधार-पॅन लिंक करण्याबाबत लिंक दिसेल. 

4. जर तुम्हाला अशी लिंक दिसली नाही, तर तुम्ही प्रोफाईल सेटिंगवर जाऊन लिंक आधार हा पर्याय निवडू शकता. 

5. यामध्ये तुम्हाला नाव, जन्मतारीख, लिंग ही माहिती भरायची आहे. 

6. तुमच्या आधार कार्डवर असलेल्या माहितीप्रमाणेच तुम्ही या पोर्टलवर तुमची माहिती भरा. 

7. ही माहिती जुळली, की तुम्हाला तुमचा आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे. आणि खाली असलेली Link now हा पर्यायावर क्लिक करायचं आहे. 

8. त्यानंतर तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक झाल्याचा मेसेज येईल. 

SMS द्वारेही करता येणार लिंक 

आधार पॅनला एसएमएसद्वारे लिंक करण्यासाठी 567678 किंवा 56161 वर SMS एसएमएस पाठवावा लागेल. याचा एक फॉरमॅट निश्चित केला आहे यूआयडीएपीएन (१२ अंकी-आधार क्रमांक) स्पेस (१० अंकी पॅन नंबर) लिहून एसएमएस SMS करावा. एखाद्याचा आधार कार्ड नंबर  ABCD12345678 आहे व  पॅन कार्ड क्रमांक  XYZ12345645 आहे. तर एसएमएस SMS  करताना हा फॉरमॅट "ABCD12345678 WXYZ123456" असा  असेल.