How To Apply Instant Pan Card: आता घरबसल्या बनवा झटपट पॅन कार्ड, प्रक्रिया जाणून घ्या

पॅन कार्ड बनवू इच्छिणाऱ्यांसाठी मोठी बातमी, आता झटपट बनवता येणार पॅन कार्ड 

Updated: Nov 13, 2022, 08:23 PM IST
How To Apply Instant Pan Card: आता घरबसल्या बनवा झटपट पॅन कार्ड, प्रक्रिया जाणून घ्या title=

मुंबई : आधार कार्ड नंतर पॅन कार्ड (Pan Card) हे सर्वात महत्वाचे कागदपत्र बनले आहे. या कागदपत्राशिवाय अनेक कामे रखडली जातात. त्यामुळे अनेकांचा पॅन कार्ड (Pan Card) बनवण्याकडे कल असतो. मात्र पॅन कार्ड बनवण्यासाठी एजंटकडे द्या नंतर तो सबमिट करणार, आणि मग तुमचं पॅन कार्ड बनून येणार, ही खुप मोठी प्रोसेस आहे. यामुळे अनेकांचा खुप वेळ वाया जातो. हा वेळ वाचवण्यासाठी आम्ही तुम्हाला पॅन कार्ड बनवण्याची प्रक्रिया सांगणार आहोत. याद्वारे तुम्ही घर बसल्या झटपट पॅन कार्ड बनवू शकता.

पॅन कार्ड (Pan Card) बनवणे आता पूर्वीपेक्षा खूपच सोपे झाले आहे. तुम्ही घरी बसूनही पॅन कार्ड बनवू शकता. यासाठी तुम्हाला आम्ही दिलेल्या काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. याअंतर्गत तुम्ही पॅन कार्डसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता. यासोबतच पॅनकार्डमध्ये काही दुरूस्ती करायची असेल, तर ती देखील करू शकता. 

'या' वेबसाईटवर जा?

पॅन कार्ड (Pan Card) ऑनलाईन बनवता यावे यासाठी अनेक वेबसाईट आहेत. जर तुम्ही देशाचे नागरीक असाल तर तुम्ही NSDL च्या (https://tin.tin.nsdl.com/pan/index.html) या UTITSL (https://www.pan.utiitsl.com/PAN/) जाऊन अप्लाय करू शकता. 
 

ऑनलाईन रक्कम किती?

जर तुम्ही कोणत्याही एजंटकडून पॅन कार्ड (Pan Card) बनवून घेतले, तर तुमचे अतिरीक्त पैसे जातात. मात्र जर तुम्ही थेट ऑनलाईन अर्ज केला तर तुम्हाला GST व्यतिरिक्त फक्त 93 रुपये शुल्क जमा करावे लागेल.ऑनलाइन फी भरण्यासाठी तुमच्याकडे क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड असणे आवश्यक आहे. याशिवाय तुम्ही बँकिंग ड्राफ्टद्वारेही पैसे जमा करू शकता. त्यानंतर तुम्हाला एक अर्ज भरावा लागेल.

डॉक्युमेंट सबमिट करा

फॉर्म भरताना तुम्हाला तुमच्याबद्दल माहिती द्यावी लागेल. येथे तुम्हाला नाव, पत्ता, वय, फोन नंबर टाकण्यास सांगितले जाईल. यानंतर तुम्हाला काही डॉक्युमेंट द्यावी लागतील. जे तुम्ही NSDL/ UTITSL कार्यालयामार्फत दस्तऐवज सबमिट करू शकता. 

महत्वाची गोष्ट म्हणजे डॉक्युमेंटशिवाय तुमचे पॅन कार्ड (Pan Card) बनवण्याची प्रक्रिया पुढे जाणार नाही. तुम्ही दस्तऐवजाची फोटो कॉपी पाठवताच, ही प्रक्रिया त्याच प्रकारे पुढे जाते. यानंतर तुम्ही अंतिम टप्प्यात पोहोचाल, जिथे तुम्हाला 10 दिवस प्रतीक्षा करावी लागेल. त्यानंतर 10 दिवसांच्या आत तुमच्या घरपोच पॅनकार्ड येईल.