मोदी है तो मुमकीन है! गौतम अदानी 2 नंबरवर पोहोचले कसे? संसदेत राहुल गांधी गरजले

'अशी काय जादू झाली मागच्या नऊ वर्षात ते थेट दोन नंबरवर पोहोचले' संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात काँग्रेस नेते राहुल गांधी यानी अदानींच्या मुद्द्यावर पंतप्रधान मोदी आणि केंद्रसरकारवर गंभीर आरोप 

Updated: Feb 7, 2023, 03:53 PM IST
मोदी है तो मुमकीन है! गौतम अदानी 2 नंबरवर पोहोचले कसे?  संसदेत राहुल गांधी गरजले title=

Rahul Gandhi : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Parliament Budget Session) सहाव्या दिवशी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी अदानी, महागाई, बेरोजगारी आणि अग्निवीर योजनेवर केंद्र सरकारला घेरलं. विशेषत: अदानींच्या मुद्द्यावर राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर (Modi Government) जोरदार निशाणा साधला. रस्त्या कोणी बनवला विचारलं तर अदानींचं (Adani Group) नाव येतं, हिमाचलचं सफरचंद अदानींच्या नावावर आहे. पंतप्रधान मोदी आणि गौतम अदानी यांचे काय संबंध आहेत? हे देश जाणून घेऊ इच्छितो, असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला. 

यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांचा एक जुना फोटो दाखवला, यावरून सत्ताधाऱ्यांनी संसदेत जोरदार हंगामा केला. अदानी 2014 मध्ये 609व्या स्थानावर होते. इतक्या कमी कालावधीतते जगातील श्रीमंताच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर कसे पोहोचले, खरी जादू तेव्हा सुरु झाली जेव्हा मोदी दिल्लीत आले, असा घणाघात राहुल गांधी यांनी केला. अदानी समूह केवळ 8 ते 10 बिझनेस क्षेत्रात आहे, मग त्यांची संपत्ती 2014 मध्ये 8 अब्ज डॉलरवरुन 2022 मध्ये 144 बिलिअन डॉलरवर कशी पोहोचली, असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला.

देशात अदानींचं साम्राज्य
भारत जोडो यात्रेत तामिळनाडू, केरळ ते हिमाचलपर्यंत प्रत्येत राज्यात एकच नाव ऐकायला मिळत होतं, ते म्हणजे अदानी. या यात्रेदरम्यान तरुणवर्ग भेटत होता, आणि अनेक तरुण एकच प्रश्न विचारत होते, आम्हालाही अदानींसाराख स्टार्टअप सुरु करायचा आहे. अदानी ज्या बिझनेसमध्ये हात टाकतात, तो यशस्वी होतो. जगभरातील श्रीमंताच्या यादीत अदानी 609 व्या क्रमांकावर होते, अशी काय जादू झाली मागच्या नऊ वर्षात ते थेट दोन नंबरवर पोहोचले. राहुल गांधी आरोप करत असताना इतर काँग्रेस खासदारांनी मोदी है तो मुमकीन हे चे नारे लगावले.

'मोदींनी अदानींना कंत्राट मिळवून दिला'
सार्वजनिक क्षेत्राचा पैसा मोदींनी अदानींना दिला... मोदी विदेशात जिथे जिथे गेले तिथला व्यवसाय त्यांनी अदानींना मिळवून दिला, असा आरोप राहुल गांधींनी केला. यावेळी त्यांनी काही फोटो लोकसभेत दाखवले.... तर राहुल गांधी बिनबुडाचे आरोप करत असल्याचा पलटवार भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी केलाय.  तर राहुल गांधी बिनबुडाचे आरोप करत असल्याचा पलटवार भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी केलाय. 

अग्नीवीरवरुन सरकारवर टीका
यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या अग्नीवीर योजनेवरुनही जोरदार टीका केली. अग्नीवीर योजना ही सैन्याची नाही असं निवृत्त लष्कर अधिकारी सांगत असल्याचं राहुल गांधी यांनी सांगितलं. अग्निवीर ही योजना अजित डोव्हालांनी आर्मीवर थोपवलेली योजना असल्याची टीका राहुल गांधीनी लोकसभेतील भाषणात केली. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर लोकसभेतील चर्चेदरम्यान राहुल गांधीनी जनतेच्या 
प्रश्नांची यादी मांडली.. भारत जोडो यात्रेतील अनुभवांचं कथन करताना सरकारच्या योजना जनतेसाठी उपयोगी पडत नसल्याचं सांगितलं.  राष्ट्रपतींच्या भाषणात, बेरोजगारी, महागाई हे जनतेच्या संबंधित विषयांचा उल्लेख नसल्याची टीका राहुल गांधी यांनी केली.