संसदेत घुसखोरी करणारे 'भगत सिंह फॅन क्लब'चे सदस्य, दीड वर्षापूर्वी रचला कट आणि... तपासात धक्कादायक खुलासे

Parliament Security Breach : संसदेतघुसखोरी करणाऱ्या आरोपींना अटक करण्यता आलं असून त्यांची चौकशी सुरु आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे सर्वा आरोपी सोशल मीडिया पेज भगत सिंह फॅन क्लबशी जोडले गेले आहेत.दीड वर्षांपूर्वी हे सर्वजण मैसूरमध्ये एकत्र आले होते. 

राजीव कासले | Updated: Dec 14, 2023, 01:38 PM IST
संसदेत घुसखोरी करणारे 'भगत सिंह फॅन क्लब'चे सदस्य, दीड वर्षापूर्वी रचला कट आणि... तपासात धक्कादायक खुलासे title=

Parliament Security Breach : संसद घुसखोरी प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. लोकसभा सचिवालयाने 8 कर्मचाऱ्यांना निलंबीत (Suspend) केलंय. सुरक्षेत हलगर्जीपणा केल्याचा ठपका या कर्मचाऱ्यांवर ठेवण्यात आलाय. रामपाल, अरविंद, वीर दास, गणेश, अनिल, प्रदीप, विमीत आणि नरेंद्र अशी या कर्मचाऱ्यांची नावं आहेत. तर संसदेची काल सुरक्षा व्यवस्था भेदल्यानंतर आज सुरक्षा यंत्रणा अलर्ट झालीय. संसद भवन आणि परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. संसदेच्या सर्वच प्रवेशद्वारावर बॅरिकेट्स लावण्यात आलेत. संसद भवन परिसरातील रस्त्यावरून जाणाऱ्या वाहणांची कसून चौकशी केली जात आहे.

पोलीस तपासात धक्कादायक खुलासे
दरम्यान, संसदेत घुसखोरी करणाऱ्या आरोपींची चौकशी सुरु असून तपासात धक्कादायक खुलासे होत आहेत. संसदेत घुसखोरी करणाच्या कटाचा मास्टरमाईंड वेगळाच असल्याचं तपासात समोर आलं आहे. पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. तर सहावा आरोपी फरार आहे, त्याचं नाव ललित झा असल्याचं समोर आलं असून हाच कटाचा मास्टरमाईंडही होता. संसदेच्या बाहेर अमोर शिंदे (Amol Shinde) आणि नीलम कौर (Neelam Kaur) निदर्शन करत असताना ललित झा तिथे होत, आणि त्याने आपल्या मोबाईलमध्ये सर्व घटना कैद केली. त्यानंतर तो व्हिडिओ आपल्या साथीदारांना व्हॉटअॅप केला. त्यानंतर तो तिथून फरार झाला. 

हे सर्वजण एकमेकांना ऑनलाईन ओळखत होते. सोशल मीडिया पेज भगतसिंग फॅन क्लबशी हे सर्वजन जोडले गेले होते. दीड वर्षांआधी म्हैसूरमध्ये त्यांची भेट झाली.  तिथेच त्यांनी कट रचायला सुरुवात केली. तर काही महिन्यांआधीच चौघांनी  संसदेत घुसखोरी  करण्याच्या प्लॅनला अंतिम स्वरुप दिलं होतं. जुलै महिन्यात सागरने संसदेत घुसण्याचा प्लान केला. पण यात तो यशस्वी झाला नाही. यानंतर 13 डिसेंबर तारीक ठरवण्यात आली. यासाठी 10 डिसेंबरपासून एक-एक करत सर्व आरोपी आपापल्या राज्यातून दिल्लीत दाखल झाले. सर्वजण आधी इंडिया गेटजवळ भेटले. तिथे त्यांना स्मोक कँडल देण्यात आली. 

सागर शर्माचं फेसबूक पेज
संसदेत घुसखोरी करणारा मुख्य आरोपी सागर शर्मा हा लखनऊ मानकनगर इथं राहाणारा असून त्याच्यावर डाव्या विचारसरणीचा पगडा आहे. त्याचे दोन फेसबूक अकाऊंट असो तो यावर अशाचप्रकारचे पोस्ट शेअर करत होता. पण गेल्या काही महिन्यांपासून त्याचं पेज अॅक्टिव्ह नव्हतं. त्याच्या फेकबूक पेजवरन तो कोलकाता, राजस्थान आणि हरियाणा राज्यातील काही लोकांच्या संपर्कात होता. घटना घडल्यानंतर सागरच्या कुटुंब ज्या ठिकाणी रहात होतं, त्या घराला टाळं लावून अज्ञात ठिकाणी निघून गेले आहेत. सागरच्या घरात त्याेच आई-वडील आणि लहान बहिण आहे. हे कुटुंब मूळचं उत्तर प्रदेशमधल्या उन्नाव जिल्ह्यातीलआहे. गेल्या 20 वर्षांपासून ते लखनऊमध्ये भाड्याने घर घेऊन रहात होते. सागर लखनऊमध्ये रिक्षा चालवयचा. दीड महिन्यापूर्वी त्याने इलेक्ट्रीक रिक्षा भाड्याने घेतली होती. 

काँग्रेसचं आंदोलन
दरम्यान, भाजप खासदार प्रताप सिम्हा यांच्या म्हैसूर इथल्या घर आणि कार्यालयासमोर काँग्रेसनं आंदोलन केलंय. आरोपींनी खासदार सिम्हा यांच्या विजीटर पासवर संसदेत प्रवेश केल्यानं त्यांना विरोधाकडून लक्ष्य केलं जात आहे. आंदोलकांनी  सिम्हा यांच्या राजीनाम्याची मागणी केली.