मुंबई : आपण अनेकदा ऐकले आहे की कोणाच्यातरी जवळच्या व्यक्तीने ऑनलाइन ऑर्डर केली आणि त्या बदल्यात दुसरे काहीतरी मिळाले. कधी महाग, कधी स्वस्त वस्तू मिळतात. काही लोक त्याबद्दल तक्रार करतात, तर काही शांतपणे ठेवून घेतात. अशा प्रकरणांमध्ये सहसा असे दिसून येते की एखादी व्यक्ती महागड्या वस्तूची ऑर्डर देते आणि त्याला काही निरुपयोगी वस्तू मिळते. पण आता एक अतिशय वेगळी घटना समोर आली आहे.
एका विचित्र घटनेत, केरळच्या वायनाड जिल्ह्यातील कन्यामबेटाचा मूळ रहिवासी असलेल्या मिथुन बाबू नावाच्या व्यक्तीला पासपोर्ट कव्हरच्या बदल्यात मूळ पासपोर्ट मिळाला आहे. जो त्याने ई-कॉमर्स कंपनी Amazon वरून ऑनलाइन ऑर्डर केला होता.
वायनाड येथील व्यक्तीने 30 ऑक्टोबर रोजी अॅमेझॉनवरून पासपोर्ट कव्हर मागवले होते. 1 नोव्हेंबर रोजी त्याचं पार्सल आले. त्याने डिलिव्हरी पॅकेट उघडले तेव्हा त्याला कव्हरसह अस्सल पासपोर्ट मिळाला. एवढेच नाही तर पासपोर्ट त्याचा नसून त्रिशूरमधील कुन्नमकुलम येथील रहिवासी असलेल्या मुहम्मद सलीह नावाच्या कोणाचा होता.
घटनेची तक्रार करण्यासाठी त्या व्यक्तीने तात्काळ Amazon Customer Car ला संपर्क साधला. पण त्याहूनही धक्कादायक ग्राहक सेवा कार्यकारिणीची प्रतिक्रिया होती, ज्यांनी भविष्यात अशा प्रकारची पुनरावृत्ती होणार नाही आणि पुढच्या वेळी विक्रेत्याला अधिक सावधगिरी बाळगण्याची सूचना देणार असल्याचे सांगितले.
कस्टमर केअर एक्झिक्युटिव्हनेही त्यांना दिलेल्या पासपोर्टचे काय करायचे ते सांगितले नाही. मात्र, मिथुन बाबू लवकरच पासपोर्ट मालकाला देण्याचा विचार करत आहेत. असा गोंधळ होण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये केरळमधील अलुवा येथील एका व्यक्तीने Amazon वरून iPhone 12 ऑर्डर केला, परंतु त्यात 5 रुपयांचे नाणे असलेले डिशवॉशिंग बार सापडले.