'या' मंदिरात दडलंय जगाच्या अंताचे रहस्य,जाणून घ्या काय आहे सत्य?

Patal Bhuvaneshwar Cave Temple :  भुवनेश्वर गुंफा मंदिर (Patal Bhuvaneshwar Cave Temple) पिथौरागढ जिल्ह्यात आहेत. या मंदिरात शंकराचे दर्शन घेण्यासाठी 90 फूट खोल गुहेत जावे लागते. ही गुहा प्रवेशद्वारापासून 160 मीटर लांब आहे.

Updated: Dec 7, 2022, 07:24 PM IST
'या' मंदिरात दडलंय जगाच्या अंताचे रहस्य,जाणून घ्या काय आहे सत्य?   title=

Patal Bhuvaneshwar Cave Temple : देशभरात अशी अनेक रहस्यमय मंदिर (Mysterious temple)  आणि गुहा (cave) आहेत. यातील अनेक मंदिरांचा शोध लागलाय, तर अद्याप अजून अनेकांचा बाकी देखील आहे. अशाच एका शोध लागलेल्या मंदिराविषयी तुम्हाला माहिती देणार आहोत. हे मंदिर उत्तराखंडच्या पिथौरागढमध्ये आहे. या मंदिराचे नाव भुवनेश्वर गुफा मंदिर असून, यामध्य़े जगाच्या अंताचे रहस्य दडले असचल्याचे बोलले जाते. मात्रव या दाव्यात किती तथ्य आहे, याचा ठोस पुरावा समोर आला नाही आहे.  

गुहेत काय आहे? 

भुवनेश्वर गुंफा मंदिर (Patal Bhuvaneshwar Cave Temple) पिथौरागढ जिल्ह्यात आहेत. या मंदिरात शंकराचे दर्शन घेण्यासाठी 90 फूट खोल गुहेत जावे लागते. ही गुहा प्रवेशद्वारापासून 160 मीटर लांब आहे. या मंदिरात 33 कोटी देवतांचा वास असल्याचे मानले जाते. या गुहेत अनेक खडकांची रचना आणि विविध देवतांच्या गुंतागुंतीच्या प्रतिमा कोरल्या गेलेल्या आहेत. 

मंदिराचा शोध कसा लागला? 

ही गुहा त्रेतायुगात ऋतुपर्ण राजाने उघडली होती,असे बोलले जाते. तसेच पांडवांच्या युगात (Pandavas Era) देखील पांडवांनी गुहा पुन्हा उघडली होती, अशी मान्यता आहे. माहितीनुसार, आदिगुरु शंकराचार्यांनी स्कंदपुराणासह इसवी सन 819 मध्ये प्रथमच ही गुहा शोधून काढली होती. त्यानंतर त्यांनीच राजाला या गुहेची माहिती दिली होती. यानंतर गुहेत पुजारी (भंडारी घराणे) राजांनी पूजेसाठी आणले. तेव्हापासून आजपर्यंत या मंदिरात फक्त कर भंडारी घराण्याचे लोकच पूजा करतात.

मंदिराला 4 दरवाजे आहेत?

पौराणिक कथेनुसार पाताळ भुवनेश्वर गुहेत (Patal Bhuvaneshwar Cave Temple) चार दरवाजे आहेत.पुराणानुसार मंदिराला युद्धद्वार, दुसरा पाप द्वार, तिसरा धर्मद्वार मआणि चौथा मोक्षद्वार आहे. असे म्हणतात की, जेव्हा रावणाचा मृत्यू झाला, तेव्हा पाप द्वाराचे दरवाजे बंद झाले होते. त्यानंतर कुरूक्षेत्रात महाभारतानंतर युद्धभूमीही बंद झाली होती. स्कंद पुराणानुसार भगवान शिव पाताल आणि भूवनेश्वर गुफा मंदिरात वास करतात. असे मानले जाते की सर्व देवता या मंदिरात भगवान शंकराची पुजा करायला येतात. 

काय खास आहे मंदिरात ?

या मंदिराची खासियत म्हणजे, मंदिरात चार खांब आहेत, ज्यांना युगांनुसार नावे दिली आहेत. सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. सर्व खांबांमध्ये कोणताही बदल नाही परंतु कलियुगच्या खांबाची लांबी इतर खाब्यांपेक्षा जास्त आहे.

...तर जगाचा अंत 

या मंदिरात (Patal Bhuvaneshwar Cave Temple) विराजमान असलेल्या शिवलिंगाचा आकारही झपाट्याने वाढत आहे. असे मानले जाते की, जेव्हा हे शिवलिंग गुहेच्या छताला स्पर्श करेल तेव्हा जगाचा अंत होईल.

दरम्यान शिवलिंग (Patal Bhuvaneshwar Cave Temple) जर गुहेच्या छताला स्पर्श झाल्यास जगाचा अंत होईल,असे बोलले जात आहे. मात्र यामध्ये कितपत तथ्य आहे, हे सांगता येणार नाही आहे. ती रचलेली कथा देखील असू शकते, असेही बोलले जातेय.