UPI युजर्ससाठी आनंदाची बातमी, आता पेमेंट करण्यासाठी मिळणार ही सुविधा

Single Block and Multiple Debits: गेल्या काही वर्षात डिजिटल व्यवहाराचं प्रमाण वाढलं आहे. बाजार असो की प्रवास सर्वच ठिकाणी डिजिटल माध्यमातून पेमेंट होत आहे. पेमेंट करण्यासाठी तुम्ही अनेकदा युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) वापरत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. 

Updated: Dec 7, 2022, 06:48 PM IST
UPI युजर्ससाठी आनंदाची बातमी, आता पेमेंट करण्यासाठी मिळणार ही सुविधा title=

Single Block and Multiple Debits: गेल्या काही वर्षात डिजिटल व्यवहाराचं प्रमाण वाढलं आहे. बाजार असो की प्रवास सर्वच ठिकाणी डिजिटल माध्यमातून पेमेंट होत आहे. पेमेंट करण्यासाठी तुम्ही अनेकदा युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) वापरत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. नव्या सुविधेअंतर्गत आता तुम्ही खात्यातील रक्कम ठरावीक कामासाठी ब्लॉक करू शकता. त्याचबरोबर हॉटेल बुकिंग आणि शेअर्सची खरेदी-विक्रीसाठी युपीआयद्वारे पेमेंट करू शकता. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बुधवारी UPI मध्ये एकल पेमेंट रक्कम 'ब्लॉक' करण्याची आणि ती वेगवेगळ्या कारणांसाठी (Single Block and Multiple Debit) कापण्याची सुविधा जाहीर केली आहे. ऑटो पेमेंट म्हणजे अकाउंटमधून ठरलेली रक्कम कापली जाईल. ग्राहक त्यांच्या बँक खात्यांमध्ये आवश्यकतेनुसार वजावटीसाठी निधी राखून संबंधित व्यापाऱ्यांना पेमेंट शेड्यूल करू शकतात. 

हॉटेल बुकिंग इत्यादीसाठी पैसे देऊ शकता

आरबीआय गव्हर्नर म्हणाले की, यूपीआयची मर्यादा वाढवून, वेगवेगळ्या सेवांसाठी पैसे भरण्यासाठी ग्राहकांच्या खात्यातील पेमेंट 'ब्लॉक' करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तुम्ही ही सेवा हॉटेल बुकिंग आणि शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी वापरू शकता. 

बातमी वाचा- Sula Vineyards IPO: शेअर बाजारात सूला वाईनयार्ड्सची चर्चा, इतके कोटी जमवण्यासाठी तयारी

यापूर्वी, आरबीआयकडून चलनविषयक पुनरावलोकन धोरण (MPC) जाहीर करताना, रेपो दरात 35  बेसिक प्वाईंटची वाढ जाहीर केली आहे. सलग पाचव्यांदा रेपो दरात वाढ झाल्याने तो 6.25 टक्क्यांवर पोहोचला आहे. मे महिन्यानंतर ही पाचवी वेळ आहे जेव्हा रेपो रेट वाढवण्यात आला आहे. यासोबतच आगामी काळात महागाईचा दर कमी होईल, असा विश्वास आरबीआयने व्यक्त केला आहे.