'माझ्याशी लग्न कर किंवा 50 लाख दे', तरुणीचे नको ते फोटो काढले, मित्रांना पाठवले अन्...

Girl blackmailing Case Crime News: मुलीच्या कार्यालयातील काही लोकांना आक्षेपार्ह फोटो पाठवले. तो फोटो मुलीच्या काही मित्रांनाही पाठवला. मुलीच्या येणाऱ्या सासरच्या घरीही माहिती गोळा केली अन्...

Updated: Nov 13, 2022, 11:09 PM IST
'माझ्याशी लग्न कर किंवा 50 लाख दे', तरुणीचे नको ते फोटो काढले, मित्रांना पाठवले अन्... title=
Patna girl blackmailing case

Crime News : एका तरुण आणि तरुणीची ओळख झाली. दोघं चांगलं बोलू लागले. हळूहळू दोन वर्षांपूर्वी मैत्रीत (Friendship) रुपांतर झालं. त्यानंतर तरुणाने तरूणाची फायदा उचलला. तरुणाने दोन वर्षात तिच्या खात्यावरून 13 लाख रुपयांचा व्यवहार केला. अशातच आता तरुणीचं लग्न होणार असताना त्याने तिच्याकडे पैशांची मागणी केली. मात्र, त्याबद्दल तरुणीला काही सांगितलं देखील नाही. त्यानंतर आरोपीने तिला ब्लॅकमेल (blackmail) करण्यास सुरुवात केली.

दोघांमध्ये टोकाची भांडणं झाली. त्यानंतर तरुणीने पोलिस ठाण्यात तक्रार (Police Station Complaint) देखील केली. मात्र, गडी तरीही घाबरला नाही. त्याने मुलीच्या कार्यालयातील काही लोकांना आक्षेपार्ह फोटो पाठवले. तो फोटो मुलीच्या काही मित्रांनाही पाठवला. मुलीच्या येणाऱ्या सासरच्या घरीही माहिती गोळा केली आणि तिथेही फोटो आणि व्हिडिओ पाठवण्याची धमकी देऊ लागला. 

नेमकं काय झालं?

आरोपी एम्समध्ये (AIIMS) कर्मचारी आहे. दारू पिऊन तो घाणेरड्या शिव्या देतो, असा आरोप आहे. नोकरी लावून देण्याच्या नावाखाली पत्नीच्या नातेवाईकांकडूनही पैसे घेतले. त्याने तरुणीचा मोबाईल नंबर दिला होता. नोकरी न मिळाल्याने ज्यांच्याकडून त्याने पैसे घेतले होते, त्यांनी पीडितेच्या मोबाइलवर कॉल करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आता पीडितेला त्रास सहन करावा लागतोय.

आणखी वाचा - कुत्र्याच्या लग्नासाठी मंडप सजला, वऱ्हाडी जमली! पण झालं की...

दरम्यान, या घटनेनंतर तरुणी मानसिक तणावाखाली (Mental Stress) आली. तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल (Crime News) करून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी आरोपीला नोटीस दिली, मात्र त्यानंतर देखील तो आला नाही. 50 लाख रुपये दे नाहीतर लग्न कर, अशी धमकी आरोपी देऊ लागला. त्यामुळे तरुणीला मानसिक त्रास सहन करावा लागतोय.