पटना : तुम्हाला कपील शर्माचा 'किस किस को प्यार करु' हा सिनेमातर माहितच असेल, ज्यामध्ये तो चार लग्न करतो. चार बायका संभाळायला त्याला कशी तारेवरची कसरत करावी लागली हे देखील तुम्ही पाहिले असाल. परंतु एक साथ इतक्या बायका संभाळने काही साध्या सुध्याचे काम नाही. आता तुम्ही म्हणाल की, हे तर फक्त सिनेमातच होऊ शकते, खऱ्या अयुष्य़ात तर हे होणे शक्य नाही. पण आम्ही तुम्हाला अशाच एका व्यक्तीची कहाणी सांगणार आहोत, ज्याने सिनेमातल्या कहाणीला खरे केले आणि चक्कं तीन बायका केल्या, परंतु अखेरीस तो पकडला गेलाच.
सिनेमातल्या नायकाला त्याच्या बायकांनी शेवटी त्याला स्वीकारले होते. परंतु खऱ्या आयुष्यात मात्र या व्यक्तीने तीन बायका केल्याने तुरुंगाची हवा खावी लागली.
पटनातील पोतही खेड्यात रहाणाऱ्या या व्यक्तीचे नाव संजय पासवान आहे. त्याला लग्नाची इतकी हौस होती की, त्याचे तीन-तीन लग्न केले. त्याने कोणत्याही पत्नीला आपल्या लग्नाविषयी सांगितले नाही. त्याने प्रथम काशीनगदर धनरूआ येथील बेबी नावाच्या मुलीसोबत लग्न केले. त्या दोघांना तीन मुले देखील आहेत. नंतर त्याने दुसरे लग्न ममता नावाच्या महिलेसोबत केले. त्या दोघांनाही एक मुलगा आहे. नंतर संजयने तिसऱ्यांदा जटड्डूमरी येथे राहणाऱ्या पुष्पाशी लग्न केले.
संजय पासवान इतका लबाड आणि हुशार होता की, त्याने त्याच्या तिन्ही बायकांना वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले होते. परंतु त्याच्या वागण्यामुळे त्याची तिसरी बायको पुष्पाला त्याच्यावर संशय आला. त्यामुळे तिने त्याच्यावर पाळत ठेवायला सुरवात केली. त्यानंतर तिला हा सगळा प्रकार उघड झाला आणि तिने आपल्या नवऱ्याला पुराव्यानिशी पकडले.
पुष्पाने एके दिवशी पती संजयला त्याची दुसरी पत्नी ममतासोबत पकडले, त्यानंतर तिघांमध्ये भांडण झाले. वाद इतका वाढला की, पुष्पाने पोलिस स्टेशनमध्ये जाऊन आपल्या पतीविरोधात तक्रार दाखल केली. तक्रारीत असे लिहिले आहे की, जेव्हा संजय आपल्या दुसऱ्या पत्नी ममताबरोबर होता, त्यावेळी मुलाने त्याला 'पापा' म्हणून उच्चारले. हे शब्द ऐकताच पुष्पाला संपूर्ण प्रकरण लक्षात आले आणि मग तिने पोलिस स्टेशनमध्ये आपल्या पती विरेधात तक्रार नोंदवली.
पत्नीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी संजयला अटक केली आहे, कोर्टाच्या आदेशानंतर त्याला तुरूंगात पाठवण्यात आले आहे. संजयच्या विरूद्ध कलम 420 अन्वये फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर पोलिस संपूर्ण प्रकरणाचा तपास घेत आहेत.