Maharashtra Politics : काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची जीभ छाटणाऱ्यांना 11 लाखांचे बक्षीस देऊ असं वादग्रस्त विधान शिंदेंच्या शिवसेनेचे (Sivsena) आमदार संजय गायकवाडांनी (Sanjay Gaikwad) केलंय. आरक्षण संपवण्याची भाषा करणाऱ्या राहुल गांधींवर आक्षेपार्ह भाषेत संजय गायकवाडांनी टीका केलीय. आरक्षणाची भाषा संपवणाऱ्यांचं मनातील ओढावर आल्याचंही गायकवाड म्हणालेत. राहुल गांधी यांना मागासवर्गीय , आदिवासी सह इतरांचे शंभर टक्के आरक्षण संपवायचे आहे, काँग्रेसचा खरा चेहरा आणि पोटातील मळमळ बाहेर आली, असं आमदार संजय गायकवाड यांनी म्हटलं आहे. त्यांच्या वादग्रस्त विधानाचे तीव्र पडसात उमटण्याची शक्यता आहे.
मविआचे नेते आक्रमक
राहुल गांधींबद्दल वादग्रस्त विधान करणा-या संजय गायकवाडांविरोधात महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झालेत. सत्तेमुळे हिंसेची व्यवस्था निर्माण झालीय. भाजपनं संजय गायकवाडांवर सुमोटो कारवाई अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलीय. तर मोदींबद्दल असं विधान केलं असतं तर जी कारवाई केली असती, तीच करावाई संजय गायकवाड करण्याची मागणी अंबादास दानवेंनी केलीय.
तर सप्टेंबर सत्तारुढ पक्षाचे आमदार लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्यांची जीभ छाटण्यासाठी बक्षीस जाहीर करतात आणि राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री बघ्याची भूमिका घेतात, ही आज राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची विदारक स्थिती आहे. महाराष्ट्रात सामाजिक सलोखा बिघडवण्याचं काम या सरकारने केलं आहेच, पण राजकीय सलोखा आणि संसदीय प्रथा, परंपरा, सन्मान धुळीला मिळवण्याचं काम या सरकारने केलं आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. या सरकारने आमदार संजय गायकवाड विरोधात त्वरित गुन्हा दाखल करावा अशी मागणी विरोधी पक्षनेते यांनी केली.
भाजपने हात झटकले
दरम्यान संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावर भाजपने हात झटकले आहेत. संजाय गायकवाड यांच्या वक्तव्याचं समर्थन करत नाही, असं भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. तसंच आरक्षण रद्द करू असं राहुल गांधी म्हणाले. नेहरू, राजीव गांधी आता राहुल गांधी, काँग्रेसच्या तीन पिढीच्या जे पोटात होतो त्याच आज ओठात आलं. NDA सरकार संविधान बदलनार असं वक्तव्य करत होते. खरंतर काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला. खऱ्या आरक्षणाचे मारेकरी हे काँग्रेस आहे अशी टीकाही बावनकुळे यांनी केली आहे.
ENG
(1 ov) 2/0 (112.3 ov) 387
|
VS |
IND
387(119.2 ov)
|
Full Scorecard → |
WI
225(70.3 ov)
|
VS |
AUS
16/1(9 ov)
|
Full Scorecard → |
GER
(18.4 ov) 140
|
VS |
TAN
146/5(16.5 ov)
|
Tanzania beat Germany by 5 wickets | ||
Full Scorecard → |
MAW
(14.5 ov) 72
|
VS |
BRN
76/0(6.5 ov)
|
Bahrain beat Malawi by 10 wickets | ||
Full Scorecard → |
MAW
(20 ov) 166/8
|
VS |
GER
158(19.5 ov)
|
Malawi beat Germany by 8 runs | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.