आधी मंकीपॉक्स आता Nipah Virus चा धोका, देशात 24 वर्षांच्या तरुणाचा मृत्यू... , वेळीच ही लक्षणं ओळखा?

What is Nipah Virus : मंकीपॉक्सनंतर देशात आता निपाह व्हायरसने चिंता वाढवली आहे. केरळात रविवारी 24 वर्षांच्या तरुणाचा निपाह व्हायरलने मृत्यू झाला. केरळाच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी याबाबतची माहिती दिली.

राजीव कासले | Updated: Sep 16, 2024, 05:46 PM IST
आधी मंकीपॉक्स आता Nipah Virus चा धोका, देशात 24 वर्षांच्या तरुणाचा मृत्यू... , वेळीच ही लक्षणं ओळखा? title=

What is Nipah Virus : मंकीपॉक्सनंतर देशात आता निपाह व्हायरसने चिंता वाढवली आहे. केरळात रविवारी 24 वर्षांच्या तरुणाचा निपाह व्हायरलने मृत्यू झाला. केरळाच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी याबाबतची माहिती दिली. केरळातल्या (Keral) मलप्पुरममधल्या एका खासगी रुग्णालयात निपाह व्हायरसची लागण झालेल्या तरुणावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान या तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे केरळात पुन्हा एकाद निपाह व्हायरस (Nipah Virus) पसरत असल्याचं समोर आलं आहे. याआधी केरळात 2018, 2021 आणि 2023 मध्ये निपाह व्हायरचं थैमान पाहायला मिळालं होतं. कोझिकोड, वायनाड, इडुक्की, मलप्पुरम आणि एर्नाकुलम जिल्ह्यात वटवाघळांमुळे निपाह व्हायरस पसरत असल्याचं रिसर्चमध्ये कळलं होतं.

प्राण्यांमधून निपाह व्हायरसचा धोका

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) च्या मते, निपाह व्हायरस एक झुनोटिक व्हायरस आहे. म्हणजे प्राण्यांच्या माध्यमातून तो माणसात पसरतो. काहीवेळा तो खाण्यापिण्याद्वारे आणि एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पसरू शकतो. मलेशियातील सुंगाई निपाह या गावात 1999 मध्ये निपाहची पहिली घटना समोर आली होती. त्यामुळे या विषाणूला निपाह असं नाव देण्यात आलं आहे.

कसा पसरतो निपास?

इतर व्हायरसप्रमाणेच निपाह व्हायरसही प्राण्यांमधून पसरत असल्याचं मानलं जातं. हा विषाणू वटवाघळांच्या माध्यमातून मनुष्यामध्ये पसरतो. याशिवाय डुक्कर, कुत्रे, मांजर, घोडे आणि शक्यतो मेंढ्यांमधून देखील निपाह व्हायरस पसरू शकतो अशी भीती जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे. निपाह व्हायरसची लागण झाल्यास तो एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरण्याची शक्यता असते.

किती धोकादायक आहे निपाह?

निपाह व्हायरसचा संक्रमण दर कमी असला तरी तो जास्त धोकादायक मानला जातो. याचा अर्थ या व्हायरसने संक्रमित लोकं कमी असले तर मृत्यू दर जास्त असू शकतो. केरळा ज्यावेळी निपाह व्हायरचा प्रकोप झाला होता त्यावेळी मृत्यू दर 45 ते 70 टक्के इतका होता. निपाह व्हायरसने एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झालास. त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यही संक्रमित होऊ शकतात. निपाह संक्रमित मृत व्यक्तीच्या मृतदेहावर अंतिम संस्कार करतानाही काळजी घेण्याचं आव्हान तज्ज्ञांनी केलंय.

निपाह व्हायरसची लक्षणं

निपाह व्हायरसची लागण झालेल्या व्यक्तीला ताप, डोकेदुखी, श्वास घेण्यास त्रास, घशात खवखण यासारखी लक्षणं दिसतात. याशिवाय एखाद्याला एन्सेफलायटीसचा त्रास होऊ शकतो आणि 24 ते 48 तासांच्या आत कोमात जाऊ शकतो. निपाहची लक्षणं 5 ते 14 दिवसांच्या आत दिसू लागतात. काही प्रकरणात यासाठी 45 दिवसांचा अवधीही लागतो. पण हा व्हायरसचा सर्वात धोकादायक प्रकार असतो. आपण संक्रमित आहोत, हे बराच उशीरा कळतं. तोपर्यंत बराच उशीर झालेला असतो.

काय काळजी घ्याल

निपाह व्हायरसवर अद्याप कोणतीही लस आलेली नाही. खबरदारी घेणं हाच यावरचा एकमेव उपाय आहे. वघवाघूळ आणि डुकराच्या संपर्कात येण्यापासूनच वाचा. जमिनीवर पडलेली फळं खाऊ नका, मास्क लावा आणि वेळोवेळी हात साबणाने स्वच्छ धुवा. काही लक्षणं आढळल्यास तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधा.