मुंबई : आयकर परतावा दाखल करण्यासाठी आता केवळ एक आठवडा उरलाय. ३१ जुलैपूर्वी तुम्हाला आयटीआर दाखल करावा लागणार आहे. जर तुम्ही या सीमेअगोदर आयटीआर दाखल करण्यात अयशस्वी ठरलात तर तुम्हाला दंडही भरावा लागू शकतो. हा दंड किती असेल याविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात...
- ज्यांचं उत्पन्न बेसिक सूटच्या सीमेपेक्षा जास्त नाही... त्यांना आयटीआर दाखल करण्यासाठी उशीर झाला तरी कोणताही दंड भरावा लागणार नाही
- परंतु, ज्या व्यक्ती किंवा कंपन्यांचं उत्पन्न बेसिक सूटपेक्षा अधिक आहे, त्यांना इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करणं अनिवार्य आहे
- तुम्ही लहान करदाते असाल.. म्हणजेच तुमचं उत्पन्न पाच लाखांपेक्षा जास्त नसेल तर तुम्हाला जास्तीत जास्त १००० रुपयांपर्यंत दंड भरावा लागले
- जर तुम्ही ३१ जुलैपर्यंत इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करू शकला नाहीत तर तुम्हाला ५००० रुपयांचा दंड भरावा लागू शकतो.
- जर तुम्ही ३१ डिसेंबरनंतर परंतु, ३१ मार्च २०१९ पूर्वी (सध्याचं असेसमेन्ट वर्ष) इन्कम टॅक्स रिटर्न दाखल केलं तर तुम्हाला १० हजार रुपयांचा दंड भरावा लागेल