इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याचे 8 मोठे फायदे; जाणून घ्या सविस्तर

इन्कम टॅक्स रिटर्न: तुम्ही आयकराच्या कक्षेत आलात की नाही याची पर्वा न करता, तुम्ही रिटर्न भरणे आवश्यक आहे.

Updated: Nov 20, 2021, 08:44 AM IST
इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याचे 8 मोठे फायदे; जाणून घ्या सविस्तर title=

मुंबई : इन्कम टॅक्स रिटर्न 2020-21 या वर्षासाठी प्राप्तिकर रिटर्न (ITR) भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. नोकरदारांमध्ये असेही अनेक लोक आहेत. ज्यांचा पगार कराच्या कक्षेत येत नाही किंवा आला तरी आयटीआर भरण्याची गरज नाही असे त्यांना वाटते. असा विचार करणे चुकीचे आहे. तुम्ही इन्कम टॅक्सच्या कक्षेत आलात की नाही याची पर्वा न करता, पण तुम्हाला रिटर्न भरणे आवश्यक आहे. त्याचे अनेक फायदे आहेत. अशाच 8 फायद्यांबद्दल जाणून घेऊया.

व्हिसासाठी आयटीआर आवश्यक

दुसऱ्या देशात जाण्यापूर्वी व्हिसा आवश्यक आहे. व्हिसासाठी अर्ज करताना, तुम्हाला आयकर रिटर्नसाठी विचारले जाते. व्हिसा अधिकारी 3 ते 5 वर्षांचा ITR मागू शकतात. आयटीआरद्वारे हे तपासले जाते की जी व्यक्ती आपल्या देशात येत आहे किंवा येऊ इच्छित आहे, त्यांची आर्थिक स्थिती काय आहे. म्हणूनच ITR भरणे आवश्यक आहे.

आयटीआर हा सर्वात महत्त्वाचा उत्पन्नाचा पुरावा

आयकर रिटर्न भरल्यावर करदात्यांना प्रमाणपत्र मिळते. हा सरकारी पुरावा आहे, जो व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न दर्शवतो. उत्पन्नाचा नोंदणीकृत पुरावा असणे क्रेडिट कार्ड, कर्ज किंवा स्वतःचे क्रेडिट सिद्ध करण्यास मदत करते.

तुम्हाला कर परतावा हवा असल्यास

अनेक वेळा पगारदार व्यक्तीचे उत्पन्न स्लॅब कराच्या कक्षेत येत नाही, तरीही काही कारणास्तव TDS कापला जातो. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला परतावा हवा असेल तर आयटीआर भरणे आवश्यक आहे.

कर परताव्याचा दावा करण्यासाठी आयटीआर दाखल करावा लागतो. आयटीआर दाखल केल्यानंतर, आयकर विभाग त्याचे मूल्यांकन करते. जर तुमचा परतावा दिला जात असेल, तर विभाग त्यावर प्रक्रिया करतो आणि तुमच्या नोंदणीकृत बँक खात्यात टाकतो.

सहज कर्ज मिळवा

कर्ज घेताना तुमच्या उत्पन्नाचा पुरावाही पाहिला जातो. विशेषत: गृहकर्जाच्या बाबतीत, उत्पन्नाचा पुरावा म्हणून तीन वर्षांपर्यंत ITR मागितला जातो. हे सर्व सरकारी आणि निमसरकारी बँकांना लागू आहे.

तुम्ही ITR शिवाय कर्जासाठी अर्ज केल्यास बँकाही ते नाकारू शकतात. तुम्ही नियमितपणे ITR फाइल केल्यास, तुम्हाला कर्ज मिळण्याची शक्यता वाढते.

व्यवसाय सुरू करण्यासाठी ITR आवश्यक

व्यवसाय सुरू करण्यासाठी आयकर रिटर्न भरणे खूप महत्त्वाचे आहे. तुम्हाला कोणत्याही विभागाकडून कंत्राट घ्यायचे असेल तर आयटीआर कामी येईल. कोणत्याही सरकारी विभागात कंत्राट घेण्यासाठी गेल्या 5 वर्षांचा आयटीआर आवश्यक आहे.

विमा संरक्षण

विमा कंपन्या अधिक विमा संरक्षण देण्याच्या अटीवर किंवा 1 कोटी रुपयांपर्यंतच्या मुदतीच्या योजनांवर ITR पाहतात. उत्पन्नाचा स्रोत आणि परतफेडीची स्थिती तपासण्यासाठी कंपन्या ITR मागतात.

आयटीआर पत्ता पुरावा 

मॅन्युअली भरल्यावर आयकर रिटर्नची पावती नोंदणीकृत पत्त्यावर पाठवली जाते. यासोबत तो पत्ता म्हणूनही स्वीकारला जातो. आयटीआर हा देखील उत्पन्नाचा पुरावा आहे.

शेअर्समधील तोटा पुढे दाखवण्यासाठी आवश्यक

शेअर्स किंवा म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठीही आयटीआर हा एक चांगला स्रोत आहे. नुकसान झाल्यास, तोटा पुढील वर्षासाठी पुढे दाखवण्यासाठी विहित मुदतीत आयकर विवरणपत्र भरणे आवश्यक आहे.

पुढील वर्षात भांडवली नफा झाल्यास, तोटा नफ्याच्या तुलनेत समायोजित केला जाईल आणि तुम्हाला करात सूटमध्ये लाभ मिळेल.