Petrol Price Today: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या दरात चढ-उतार सुरू आहेत. इंधन दरवाढीमुळे सामान्यांचे बजेट आणखी बिघडण्याची शक्यता आहे. कच्चा तेलाच्या दरात होत असलेल्या घसरणीचा फायदा अजूनही ग्राहकांना मिळाला नाही. तर दुसरीकडे काही शहरांमध्ये पेट्रोल डिझेलच्या दरात (petrol diesel rate) बदल झाला असून मुंबई, दिल्लीसह पेट्रोल-डिझेलचे दर अद्याप स्थिर असल्याचे दिसून आले आहे.
कच्च्या तेलाच्या दरात आज वाढ झाली असून प्रति बॅरल $ 88 वर दिसून येत आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 87.35 डॉलरवर आहे. ब्रेंट क्रूडचा दर प्रति बॅरल 80.37 डॉलर आहे.
वाचा: राज्याच्या 'या' भागात अवकाळी बरसात; हवामान विभागाचं सांगणं तरी काय?
एनसीआरमधील मोठ्या शहरांपैकी नोएडामध्ये पेट्रोलची किंमत 97.00 रुपये आणि डिझेलची किंमत 89.77 रुपये प्रति लीटरवर आली आहे. तर गाझियाबादमध्ये पेट्रोल 96.26 रुपये आणि डिझेल 89.45 रुपये प्रति लिटर आहे.
बंगळुरू - पेट्रोल 101.94 रुपये आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर
हैदराबाद - पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटर
लखनौ- पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर
पाटणा – पेट्रोल 107.59 रुपये आणि डिझेल 94.26 रुपये प्रति लिटर
पोर्ट ब्लेअर - पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर
दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसत आहेत.
तुम्ही घरबसल्या पेट्रोल-डिझेलचे नवे दर चेक करू शकता. त्यासाठी तुम्हाला इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9224992249 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवा आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 टाइप करून माहिती मिळवू शकतात. त्याचबरोबर HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.