सहा दिवसांच्या स्थिरतेनंतर पेट्रोल-डिझेलच्या किंमती घसरल्या

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, कच्च्या तेलाच्या किंमतीत येत्या काही दिवसांत फारसा फरक दिसून येणार नाही

Updated: Jan 29, 2019, 08:44 AM IST
सहा दिवसांच्या स्थिरतेनंतर पेट्रोल-डिझेलच्या किंमती घसरल्या title=

मुंबई : गेल्या सहा दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती स्थिर होत्या. सातव्या दिवशी म्हणजेच २९ जानेवारी रोजी पेट्रोल-डीझेलच्या किंमतीत घसरण दिसून आलीय. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती मात्र स्थिर आहेत. सोमवारी ब्रेंट क्रूडची किंमत ६१.२९ डॉलर प्रती बॅरल होती. तर WTI क्रूड ५३.३२ डॉलर प्रती बॅरलला उपलब्ध होतं. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, कच्च्या तेलाच्या किंमतीत येत्या काही दिवसांत फारसा फरक दिसून येणार नाही... त्यामुळे पेट्रोल - डिझेलच्या किंमती स्थिर राहू शकतील. 

मुंबई

मुंबईत एक लीटर पेट्रोलची किंमत ७६.८२ रुपये तर डिझेलची किंमत ६९.०० रुपयांवर येऊन स्थिरावलीय.

दिल्ली

दिल्लीत पेट्रोलची किंमत ८ पैशांनी तर डिझेलची किंमत ११ पैशांनी घसरलीय. त्यामुळे दिल्लीत पेट्रोल ७१.१९ रुपये आणि डिझेल ६५.८९ रुपये प्रती लीटर उपलब्ध आहे. 

नोएडा 

राजधानी दिल्लीच्या बाजुलाच  वसलेल्या नोएडामध्ये पेट्रोलची किंमत ७ पैशांनी तर डिझेलची किंमत १ पैशानं घसरलीय. इथं पेट्रोल ७०.९० रुपये तर डिझेल ६५.०५ रुपयांना मिळतंय.

कोलकाता

कोलकातामध्ये एक लीटर पेट्रोलची किंमत ८ पैशांनी कमी होऊन ७३.२८ रुपयांवर पोहचलीय तर डिझेलची किंमत ६९.०० रुपयांवर स्थिर झालीय.

चेन्नई

चेन्नईत पेट्रोलच्या किंमतीत ९ पैशांची घसरण पाहायला मिळालीय. एक लीटर पेट्रोलसाठी ७३.९० रुपये तर डिझेलसाठी ६९.६१ रुपये मोजावे लागत आहेत. डिझेलच्या किंमतीत ११ पैशांची कपात झालीय.