Petrol, Diesel Price : पेट्रोल, डिझेलच्या दरात मोठा बदल

पेट्रोल, डिजेलचे आजचे दर जाणून घ्या 

Updated: Dec 27, 2020, 08:12 AM IST
Petrol, Diesel Price : पेट्रोल, डिझेलच्या दरात मोठा बदल  title=

मुंबई : Petrol,Diesel Price Update : पेट्रोल, डिझेलच्या दरात सतत बदलत होत असतात. पण गेल्या २० दिवसांत फार बदल झालेला नाही. ही आतापर्यंतच्या दरातील दुसऱ्यांदा सर्वात मोठी स्थिरता आहे. या अगोदर पेट्रोल, डिझेलच्या दरात सतत ६ दिवस वाढ झाली होती. आज तेल मार्केटिंग कंपन्यांनी किंमतींच्या दरात काही बदल केलेले नाहीत. 

या अगोदर पेट्रोल डिझेलच्या दरात ४८ दिवस बदल झालेले नाही. २० नोव्हेंबरला दर बदलायला सुरूवात झाली. या दरम्यान दर १७ वेळा वाढले. मार्च महिन्यानंतर सप्टेंबरमध्ये डिझेलच्या किंमतीत घट पाहायला मिळाली. तेल मार्केटिंग कंपन्यांनी ८२ दिवसांपर्यंत किंमतीत बदल झालेले नाहीत. 

२० नोव्हेंबर पासून आतापर्यंत तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात १७ वेळा बदल केले. दिल्लीत पेट्रोलच्या किंमतीत १७ दिवसांत २.६५ रुपये प्रती लीटर वाढले आहे. तर डिझेलच्या दरात ३.४० रुपये प्रति लीटर वाढले आहे. पेट्रोल, डिझेलचे दर या स्तरावर सप्टेंबर २०१८ मध्ये गेले होते. 

4 मेट्रो शहरांमधील पेट्रोलचे दर 

शहर             आजचे दर        
दिल्ली             83.71       
मुंबई              90.34 
कोलकाता          85.19    
चेन्नई             86.51 

4 मेट्रो शहरातील डिझेलचे दर 

शहर            आजचे दर 
दिल्ली            73.87
मुंबई             80.51
कोलकाता         77.44
चेन्नई            79.21  

दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलतात. पेट्रोल आणि डिझेलचे दरात एक्साइज ड्युटीस डीलर कमीशन आणि इतर काही बदल जोडून याचे दर दुप्पट होते.