Petrol-Diesel चे नवे दर जाहीर, आजच करा गाडीची टाकी फुल्ल

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत नेहमी चढ-उतार होत असतात. 21 मे पासून राष्ट्रीय बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. देशाची राजधानी दिल्लीत आज (28 ऑगस्ट) एक लिटर पेट्रोलची किंमत...

Updated: Aug 28, 2022, 09:07 AM IST
Petrol-Diesel चे नवे दर जाहीर, आजच करा गाडीची टाकी फुल्ल title=

Petrol-Diesel Price Today : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर नरमल्यामुळे भारतीय तेल कंपन्यांनी आज (रविवार), 28 ऑगस्ट रोजीही पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर ठेवले आहेत. दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईसह देशातील प्रमुख शहरांमध्ये वाहनांच्या इंधनाच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे राष्ट्रीय बाजारात पेट्रोल आणि डिझेलचे दर जैसे थेच आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत नेहमी चढ-उतार होत असतात. 21 मे पासून राष्ट्रीय बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. देशाची राजधानी दिल्लीत आज (28 ऑगस्ट) एक लिटर पेट्रोलची किंमत 96.72 रुपये आणि एक लिटर डिझेलची किंमत 89.62 रुपये आहे.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) च्या अधिकृत वेबसाइट iocl.com च्या अपडेटनुसार, देशाची आर्थिक राजधानी मुंबईत एक लिटर पेट्रोलची किंमत 106.31 रुपये आणि डिझेलची किंमत 94.27 रुपये प्रति लिटर आहे. तर कोलकातामध्ये पेट्रोलचा दर 106.03 आणि डिझेलचा दर 92.76 रुपये प्रति लिटर आहे.

प्रमुख शहरांमधील पेट्रोल आणि डिझेलच्या नवीनतम किंमती जाणून घ्या

दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नईसह प्रमुख शहरांमध्ये एक लिटर पेट्रोल आणि डिझेलचे दर खालीलप्रमाणे आहेत...

शहराचे नाव -  पेट्रोल रुपये/लीटर - डिझेल रुपये/लीटर

दिल्ली 96.72 89.62 

मुंबई 106.31 94.27 

कोलकाता 106.03 92.76 

चेन्नई 102.63 94.24  

SMS वर चेक करा पेट्रोल-डिझेलचे दर

तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलची किंमत एसएमएसद्वारे तपासू शकता. त्यासाठी तुम्हाला इंडियन ऑइलच्या (IOCL) ग्राहकांना RSP कोड लिहून ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवावा लागेल. तुमच्या शहराचा RSP कोड जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.