सलग दुसऱ्या दिवशी महागले पेट्रोल-डीझेल, जाणून घ्या आजचे दर

सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डीझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे.

Updated: Jun 28, 2019, 10:33 AM IST
सलग दुसऱ्या दिवशी महागले पेट्रोल-डीझेल, जाणून घ्या आजचे दर  title=

नवी दिल्ली : सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डीझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. शुक्रवारी पेट्रोल ५ तर डिझेल ६ पैसे प्रति लीटरने महागले आहे. गुरुवारी पेट्रोल ७ तर डिझेल ५ पैशांनी महागले होते. दोन दिवस किंमत स्थिर राहील्यानंतर सलग दोन दिवस किंमतीत वाढ होत आहे. १६ जूनला पेट्रोल आणि २० जूनला डिझेल स्वस्त झाले होते. त्यानंतर किंमती सतत वाढत गेल्या किंवा स्थिर नाहीत.

Image result for petrol zee news

शहरांतील दर 

मुंबईमध्ये पेट्रोलचे दर ७५.८७ रुपये आणि डिझेल ६७.११ रुपये आहेत. दिल्लीमध्ये एक लीटर पेट्रोलची किंमत ७०.१७ रुपये आणि डिझेलची किंमत ६७.११ रुपये इतकी आहे. कोलकातामध्ये पेट्रोल ७२.४३ रुपये आणि डिझेल ६५.७० रुपये तर नोएडामध्ये पेट्रोल ७०.१३ रुपये आणि डिझेल ६३.४७ रुपये प्रति लीटर आहे. 

येणाऱ्या दिवसांत पेट्रोल-डीझेलचे दर कमी होऊ शकतात. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पेट्रोलचे दर देखील जीएसटी अंतर्गत येऊ शकतात. त्यामुळे त्यांच्या किंमतीत कपात होऊ शकते. दुसरीकडे ईराण आणि अमेरिकेदरम्यान तणाव कमी झाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे भाव स्थिर झाले. हळूहळू उतरलेले दर देखील नोंदवले जातील. गेल्या काही दिवसांत युद्धजन्य परिस्थितीची शंका असल्याने कच्चा तेलाच्या किंमती वाढू लागल्या होत्या.