Petrol Diesel Price : पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ; मुंबईने गाठला उच्चांक

जुलैमध्ये सलग सहाव्यांदा पेट्रोलच्या दरात वाढ  

Updated: Jul 10, 2021, 08:03 AM IST
Petrol Diesel Price : पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ; मुंबईने गाठला उच्चांक

मुंबई : पेट्रोलियम इंधनाची मागणी गेल्या काही दिवसांपासून वाढली आहे. पुन्हा एकदा कच्चा तेलाच्या बाजारात पुन्हा एकदा वाढ झालेली आहे. या आठवड्याच्या शेवटी इंधनाचा दर दोन टक्क्यांनी वाढला आहे. घरगुती बाजारात तेल कंपन्यांनी पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. (Petrol, diesel prices today: Fuel prices hiked again; petrol climbs to Rs 106.93 per litre in Mumbai) 

आज पेट्रोलच्या दरात 35 पैशांनी वाढ झाली आहे. तर डिझेलच्या दराने 26 पैशांनी वाढ झाली आहे. दिल्लीतील बाजारात शनिवारी इंडियन ऑयलच्या पंपावर पेट्रोलचा दर 100.91 रुपये प्रती लीटर आहे तर डिझेलच्या दर 89.88 रुपये प्रती लीटर आहे. तर मुंबईत आजचा पेट्रोलचा दर 34 पैशांनी महागला असून 106.93 रुपयांवर पोहोचला आहे. तर डिझेलचे दर 28 पैशांनी महागलं असून ते 97.46 रुपयांपर्यंत प्रती लीटर पोहोचलं आहे.  

कोलकातामध्ये पेट्रोलचा दर 101.01 रुपये तर डिझेलचा दर 92.97 रुपये प्रती लीटर आहे. येथे क्रमशः 39 पैसे आणि 32 पैसे दरवाढ झाली आहे. चेन्नईत आज प्रती लीटर पेट्रोलचा दर 101.67 रुपये आहे तर डिझेलचा दर हा 94.39 रुपये आहे. येथे पेट्रोलमध्ये 30 पैसे आणि डिझेलमध्ये 24 पैसे दरवाढ झाली आहे. 

जुलैमध्ये सलग सहाव्यांदा पेट्रोलच्या दरात वाढ

जुलै महिन्यात सलग सहाव्यांदा पेट्रोलच्या दरात वाढ झाली आहे. तर चौथ्यांदा डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. यापूर्वी जून महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती तब्बल 16 दिवस वाढवण्यात आल्या होत्या. तर मे महिन्यातही पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती 16 दिवस वाढवण्यात आली. किरकोळ इंधन दरामधील ही दरवाढ 4 मे 2021 पासून सुरू झाली आहे. यापूर्वी 5 राज्यांमधील निवडणुकांच्या दरम्यान सलग 18 दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये कोणताही बदल झाला नव्हता. मात्र यानंतर दिल्लीत पेट्रोल 10.51 रुपये आणि डिझेलच्या 09.15 रुपये प्रती लीटर महागलं आहे. 

आपल्या शहरातील आजची किंमत जाणून घ्या

पेट्रोल-डिझेलचे दर दररोज बदलतात आणि सकाळी 6 वाजता अपडेट होतात. आपल्याला  SMSद्वारे पेट्रोल आणि डिझेलचे दररोजचे दर देखील मिळू शकतात (How to check diesel petrol price daily). इंडियन ऑईलचे ग्राहक RSP लिहून 9224992249 क्रमांकावर आणि बीपीसीएल ग्राहक RSP लिहून 9223112222 या क्रमांकावर माहिती मि