मुंबई : पेट्रोल डिझेलच्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. आज गणपती विसर्जनादिवशी पेट्रोल डिझेलच्या किंमतीनी नवी उंची गाठली आहे. भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पेट्रोल 90 रुपये प्रति लीटर पर्यंत पोहोचले आहे. इथे पेट्रोलची किंमत 89.97 रुपये तर डिझेलची किंमत 78.53 रुपये प्रति लीटर झाली आहे. आज पेट्रोलचे दर 17 तर डिझेल 11 पैशांनी वाढले.
कालच्या दिवशी पेट्रोल ११ पैशांनी महागलं तर डिझेलचे दर सलग चौथ्या दिवशी स्थिर होते. मुंबईत काल पेट्रोल ८९.८० रुपये.. तर डिझेलचा दर ७८.४२ रुपये इतक्या दराने मिळत होते. दिवसेंदिवस पेट्रोलच्या दरात वाढ होत असल्यानं सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे.