Petrol-Diesel Price : कच्चा तेलाच्या दरात वाढ, काय आहे तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर

Petrol Diesel Price Today 29 October 2023: कच्च्या तेलाच्या किंमती वाढत आहेत. ब्रेंट क्रूड 2.90% वाढून $90.48 प्रति बॅरल झाले आहे. WTI क्रूडमध्ये देखील 2.80% वाढ झाली आहे आणि दर प्रति बॅरल $ 85.54 आहे. राजधानी दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध आहे.

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Oct 29, 2023, 08:39 AM IST
Petrol-Diesel Price : कच्चा तेलाच्या दरात वाढ, काय आहे तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर title=

कच्च्या तेलाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. आज आंतरराष्ट्रीय बेंचमार्क ब्रेंट क्रूड 2.90 टक्क्यांनी वाढून 90.48 डॉलर प्रति बॅरल पातळीवर व्यवहार करत आहे. तर, डब्ल्यूटीआय क्रूडच्या किमतीत २.८० टक्क्यांनी वाढ झाल्यानंतर प्रति बॅरल $८५.५४ असा दर दिसत आहे. दरम्यान, तेल कंपन्यांनीही पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. मात्र, आज अर्थात शनिवारीही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. 29ऑक्टोबर 2023 रोजीही तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर ठेवल्या आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीतील शेवटचा बदल मे 2022 मध्ये झाला होता. तेव्हापासून दर स्थिर आहेत.

राजधानीत पेट्रोल आणि डिझेलचे दर

देशात आज शनिवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत शनिवारी पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये प्रतिलिटर तर डिझेल 94.27 रुपये प्रतिलिटर दराने उपलब्ध आहे. याशिवाय चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर 102.63 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 94.24 रुपये प्रति लिटर आहे. त्याच वेळी, शनिवारी कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे.

इतर शहरांमध्ये किंमती

नोएडामध्ये शनिवारी पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.96 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. गुरुग्राममध्ये पेट्रोल 97.18 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 90.05 रुपये प्रति लीटर दराने उपलब्ध आहे. याशिवाय चंदीगडमध्ये पेट्रोल 96.20 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 84.26 रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध आहे. त्याचवेळी, लखनऊमध्ये पेट्रोलची किंमत 96.57 रुपये आणि डिझेलची किंमत 89.76 रुपये प्रति लिटर आहे.

येथे SMS द्वारे नवीनतम दर जाणून घ्या

पेट्रोल-डिझेलचे दर रोज बदलतात आणि सकाळी 6 वाजता अपडेट होतात. तुम्ही एसएमएसद्वारे पेट्रोल आणि डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता (रोज डिझेल पेट्रोलची किंमत कशी तपासावी). इंडियन ऑइलचे ग्राहक आरएसपी स्पेस पेट्रोल पंपचा कोड 9224992249 या क्रमांकावर टाइप करून माहिती मिळवू शकतात आणि बीपीसीएल ग्राहक 9223112222  या क्रमांकावर आरएसपी पाठवून माहिती मिळवू शकतात. त्याच वेळी, HPCL ग्राहक HPPprice टाइप करून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.