एक दिवसाच्या विश्रांतीनंतर पेट्रोल पुन्हा महागलं

पेट्रोल पुन्हा महागलं

Updated: Sep 20, 2018, 11:19 AM IST
एक दिवसाच्या विश्रांतीनंतर पेट्रोल पुन्हा महागलं

मुंबई : एक दिवसाच्या विश्रांतीनंतर आज पुन्हा एकदा पेट्रोलच्या दरात वाढ झाली आहे. पेट्रोलच्या दरात आज ६ पैशांची दरवाढ करण्यात आली आहे. मुंबईत पेट्रोल ८९.६० पैसे दराने विकलं जातंय. तर डिझेल ७८.४२ रूपये दराने विकलं जात आहे. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ सुरु आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरांनी अनेक ठिकाणी नव्वदी गाठली आहे. येणाऱ्या काळात आणखी वाढ होण्याची चिन्ह आहेत. पेट्रोल दरवाढीचा फटका इतर गोष्टींच्या बाबतीतही बसू शकतो. यामुळे वस्तूंचे दर वाढण्याची शक्यता असते. यंदाची दिवाळी ही खिशाला कात्री लावणारी ठरण्याची शक्यता आहे.

राज्यातील इंधनाचे दर

सातारा

पेट्रोल  90.06
पावर पेट्रोल 92.83
डिझेल 77.67
टर्बोजेट डिझेल 80.84

शिर्डी

पेट्रोल 89.69
डिझेल 77.32

चंद्रपूर

पेट्रोल 89.63
डिझेल 77.29

बीड 

पेट्रोल 90.28 
डिझेल 78.80 

रायगड

पेट्रोल 89.70
डिझेल 77.30 

भंडारा

पेट्रोल 90.00
डिझेल 77.63

गोंदिया

पेट्रोल 90.66
डिझेल 78.27

नाशिक

पेट्रोल 90.15
डिझेल 77.83

सोलापूर

पेट्रोल 90.24
डिझेल 79.10

जळगाव

पेट्रोल 90.55 
डिझेल 78.14 

सिंधुदुर्ग

पेट्रोल 90.77 
डिझेल 78.37

कोल्हापूर

पेट्रोल 89.67
डिझेल 77.35